सिटी बेल ∆ उरण ∆
शिक्षक म्हणजे शि शिस्त ,क्ष क्षमा क कर्तव्य याही पुढे आई वडील या नंतर जीवनाला आकार देतात ते शिक्षक होय विद्यार्थी हा मातीचा गोळा असतो परन्तु त्याचे सुबक मूर्तीत रूपांतर करण्याचे काम कुंभार रुपी शिक्षक करत असतो आयुष्यात प्रभावी पने मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकाला विद्यार्थी कधीही विसरत नाही “उगवते ती पहाट असते कामावर रुजू होते तो क्षण ड्युटी असते व वयाची 58 वर्षपूर्ण होते त्याला सेवापूर्ती सोहळा असे म्हणतात “
आवरे गाव ही विशेष नररत्न याची खाण होय आवरे गावाच्या मातीचा सुगंध हा निराळा आहे ही माती ही सर्वपरिचित अशी माती आहे देशाचे भविष्य घडविणारा शिक्षक हा किमयागार असतो या देशाचा राष्ट्रपती शिक्षकच घडवितो डॉक्टर , अभियंता म्हणजे शिक्षकांचे स्थान हे खूप उंच आणि मानाचे आहे .
आवरे गावातील आदर्श शिक्षक संपुर्ण सेवा ज्यांनी शिक्षण क्षेत्रासाठी वाहिली ते उतुंग व्यक्तिमत्त्व म्हणजे श्री केशव गावंड गुरुजी यांचा जन्म 1 जून 1964 रोजी आवरे गावात अतिशय गरीब कुटूंबात झाला खरच घरची परिस्थिती अगदी बेताची होती वडिलांचे नाव जयराम गावंड व आई चे नाव भागूबाई गावंड वडील हे आपल्या कुटूंबा चे पालनपोषण करण्यासाठी आवरे गावातील पारंपरिक व्यवसाय डुबकी मारून रेती काढणे म्हणजे मचाव्यावर रेती काढणे वर काम करत होते अगदी तुटपुंज्या मानधनात संपुर्ण कुटुंबातील सदस्यचे पालन पोषण करत असताना आई सुद्धा कुटुंबात त्यांना मदत करत असत केशव गावंड गुरुजी यांच प्राथमिक शिक्षण हे रायगड जिल्हा परिषद शाळा आवरे या शाळेत झाले व माध्यमिक शिक्षण हे कर्मवीर भाऊराव पाटील पिरकोन येथे पूर्ण केले s s c पास झाल्यावर घरची परिस्थिती ही प्रतिकुल व बेताची असल्याने आवरे गावातील थोर समाजसेवक व थोर साई भक्त रामदास गवत्या गावंड यांच्या वरदहस्त आणि आर्थिक विशेष सहकार्य याने म्हणजे शिक्षण पूर्ण करण्यासाठी केलेली विशेष मदत होय 1982 ते 1984 रोजी शिक्षण क्षेत्रातील पदविका ही पनवेल येथे शासकीय अध्यापक विद्यालय पनवेल येथे पूर्ण केलं शिक्षण क्षेत्रातील अध्यापन करण्यासाठी शासनाने त्याची नेमणूक ही 18 डिसेंबर 1984 रोजी पोलादपूर येथील केवनाळे या रा जी प शाळेवर त्यांची नेमनुक झाली आवघ्या साडेचार महिन्यात त्यांची बदली 25 जुलै 1985 रोजी कर्जत तालुक्यातील दहिवली गावी झाली सहसा शैक्षणिक परंपरा असलेल्या अश्या ग्रामीण भागात झाली
गावात आपलं शैक्षणिक अस्तित्व निर्माण करून शिक्षणाचा व्यतिरिक्त आपल्या मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व या मुळे दहिवली गावात एक अस मानाचं स्थान निर्माण केलं खूप खुप जिवलग असा घरोबा तयार केलं अजून पर्यन्त दहिवली गावातील केशव गावंड सर यांना देव माणूस म्हणूनच ओळखतात तसेच शैक्षणिक कार्य हे अतुलनीय केले सर यांनी योगायोग पहा त्याच दरम्यान त्यांचा विवाह 1991 साली सुंदर अश्या सुसंकृत व सुशील अश्या सारडे गावातील उच्च शिक्षित ध.प. पाटील गुरुंजी यांच्या कन्येशी म्हणजे कल्पना हीच्याशी झाला हे बंध रेशमाचे रूपांतर लग्नाच्या बेडीत झाले कल्पना उर्फ अनुसया या सुद्धा त्या काळातील कला शाखेची पदवी पूर्ण केलेल्या होय. पनवेल येथील A S C collge पनवेल येथे पूर्ण केली त्यांना एक पुत्ररत्न व दोन कन्या असा पुत्र शुभम , शुभदा व शुभल असा परिवार आहे मुलगी आज चांगल्या ठिकाणी नोकरी करत आहे छोटी कन्या b. com च्या शेवटच्या वर्षात आहे व मुलगा शुभम हा डिप्लोमा पूर्ण करून animation या क्षेत्रात आपलं आपलं करिअर करत आहेत तुम्ही आयुष्यात काय कमविल या पेक्षा आयुष्यात काय समाजाला दिल हे खूप महत्वाचे आहे लोक किती प्रॉपर्टी कमवली या पेक्षा किती जणांच्या सामाजिक कामी आलेत हीच खरी माणसाची विपुल अशी संपत्ती होय कर्जत तालुक्यात गावंड सर यांनी सलग 10 वर्ष अशी शिक्षण सेवा केली आवरे शाळा ही मातब्बर अश्या जुन्या शिक्षक यांच्या नेतृत्वाखाली होती त्यापैकीच द.ना.गावंड ,का गो पाटील , ना ग ठाकूर, रा का गावंड , दे .रा .गावंड , के का भोईर म तू गावंड , ह रा म्हात्रे बा ना भोईर बा बु म्हात्रे यांच्या निवृत्ती नंतर जी पोकळी निर्माण झाली ती शा ल गावंड गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली खाली श्री केशव गावंड सर यांनी धुरा सांभालळी व आवरे शाळेत त्यांच्या काळात नवोपक्रम राबविण्यात यायला सुरुवात झाली रा ग गावंड कला क्रीडा शैक्षणिक सामाजिक या संस्थेच्या माध्यमातून खेळ व सांस्कृतिक उपक्रम राबविणे हे विशेषतः उपक्रम त्यांनी मराठी शाळेत घेतले विद्यार्थीना सतत प्रोत्साहन देणे हे त्यांचे विशेष गुणवैशिष्ट्ये होय रा जी प शाळा आवरे चे शतक महोत्सव वर्ष आणि सदर कार्यक्रम प्रसंगी ज्ञानप्रसार क शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य बाळासाहेब म्हात्रे सर यांनी रा जि प शाळा। ही तंत्रज्ञान युक्त सज्ज होण्यासाठी 5 संगणक हे गावंड सर यांच्या कारकिर्दीत स्वीकारन्यात आले तसेच सुयश क्लासेस आवरे तर्फे देण्यात आलेली प्रोत्साहन पर विद्यार्थ्यांना पारितोषिक सुद्धा गावंड सर या मार्फत देण्यात तसेच आवरे ग्रामस्थांनी सुद्धा देण्यात आलेली पारितोषिक ही सुद्धा गावंड सर या मार्फत देण्यात आली आली कर्जत तालुक्यातुन त्यांची बदली 10जाने 1996 रोजी त्यांची ही पनवेल गटात झाली तसेच पनवेल गटातून 2003 साली आपल्या मायभूमीत म्हणजे आपण ज्या शाळेत शिकलो त्याच शाळेवर अध्यापन करण्यासाठी रायगड जिल्हा परिषद शाळा आवरे या ग्रामीण परन्तु आवरे गावातील शिक्षणाची पंढरी समजली जाणाऱ्या आवरे शाळेवर झाली या आवरे शाळेत 14जुलै 2003 ते 31मार्च 2011अशी दीर्घ सेवा दिली 11एप्रिल 2011मध्ये त्यांना प्रोमोशन मिळाले डाऊरनगर येथील शाळेत तदनंतर 13नोव्हेंबर 2013 साली पुन्हा एकदा आपली बदली ही माय भूमीत झाली म्हणजे सर्वात जास्त सेवा ही आपल्या आवरे गावात झाली आणि याच शाळेतून केशव गावंड सर यांची सेवा निवृत्ती ही त्यांचे गुरुवर्य अ ना पाटील गुरुजी यांच्या उपस्थितीत झाली म्हणजे आपल्या गुरुवर्य यांना दिलेला विशेष मान सन्मान हेच केशव गावंड सर यांच्या सेवा निवृत्ति चे विशेष वैशिष्ट्य होय शिक्षण क्षेत्रात अभिनव योगदान दिल्याबद्दल 2019 रोजी त्यांना उरण तालुक्यातील आदर्श शिक्षक हा पुरस्कार सन्मानीय हरिसचंद्र ठाकूर यांच्या नावाचा पुरस्कार मिळाला पुरस्कार म्हणजे काय तर विद्यार्थ्यांनि आपल्या बद्दल दिलेली चांगली प्रतिक्रिया म्हणजे पुरस्कार होय. जिवनातील अथांग सागरात कितीतरी तुफान येतात परन्तु जो शांत व सयमाणे आपली नौका हाकतो तो नौका किनाऱ्यावर नीटनेटकेपणे आणतो आपल्या 37 वर्ष 5 महिन्याच्या सेवा काळात गावंड सर यांनी अनेक विद्यार्थी हे घडविले मग डॉक्टर , अभियंत्रकी चित्रकार असे अनेक विद्यार्थी हे आपल्या अनमोल मार्गदर्शनामुळे घडले . त्यानच्या शैक्षणिक कार्यात माझी मदत झाली तर कौटुंबिक बाबतीत त्यांचे भाऊ आत्माराम गावंड यांची मदत झाली.
आवरे गावातील गावंड सर यांनी निवृत्ती नंतर सुद्धा शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात स्वतः ला गुंतविण्याचा संकल्प केला आहे.







Be First to Comment