सिटी बेल ∆ उरण ∆ सुनील ठाकूर ∆
उरण तालुका कृषी अधिकारी कार्यालय उरण यांच्यामार्फत उरण तालुक्यात ठिकठिकाणी कृषी संजीवनी सप्ताह साजरा करण्यात येत आहे.
मौजे बेलोंडेखार येथे कृषी संजीवनी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये रोपवाटिका व्यवस्थापन, भात लावणी तंत्रज्ञान, संतुलित खत व्यवस्थापन, महाडीबीटी यांत्रिकीकरण, PMFMF योजना व व इतर योजनेचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले तसेच आत्मा अंतर्गत महिलांना परसबाग भाजीपाला बियाणे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमास कृषी सहाय्यक विभावरी चव्हाण, बीटीएम कविता ठाकूर यांच्यासह उपसरपंच सौ .सोनाली विलास पाटील ग्रामपंचायत सदस्य तसेच सर्व महिला गटाच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष व मोठ्या प्रमाणात महिला शेतकरी उपस्थित होते.
Be First to Comment