सिटी बेल ∆ रसायनी ∆ राकेश खराडे ∆
विद्या प्रसारिणी सभा चौक संचलित सरनौबत नेताजी पालकर विद्यामंदिर व यशवंतराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालय चौकमध्ये जनतेची जान असलेला, प्रजाहितदक्ष, मोठ्या दिलाचा राजा राजर्षि शाहू महाराज जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.
यावेळी संस्थेचे सेक्रेटरी योगेंद्रभाई शहा यांनी राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करत राजर्षी शाहू महाराजांचे कार्य विशद केले.जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाहीत त्यांना एक रुपया दंड ठोकणारा राजा शाहू महाराज तसेच कला, संस्कृती,क्रिडा,शिक्षण यांना राजाश्रय, आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा राजा म्हणून राजश्री शाहू महाराज यांची ओळख आहे.असे संस्थेचे सेक्रेटरी योगेंद्र भाई शहा यांनी सांगितले.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक भोमले सर , उपमुख्याध्यापिका पुजारी मॅडम ,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .मुकुंद वरुडे यांनी सुञसंचलनाबरोबर शाहू महाराजांचे कार्या विषयी विचार व्यक्त केले.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अनिल बडेकर केले.







Be First to Comment