Press "Enter" to skip to content

मनोहरशेठ भोईर यांच्या हस्ते भुमीपूजन

फुंडे गावामध्ये जल जीवन मिशन अंतर्गत पिण्याच्या पाण्याच्या टाकीच्या कामाचे भुमीपूजन संपन्न

सिटी बेल ∆ उरण ∆ विठ्ठल ममताबादे ∆

श्री छ्त्रपती शाहू महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधुन उरण तालुक्यातील फुंडे गावामध्ये जल जीवन मिशन अंतर्गत पिण्याच्या पाण्याच्या टाकीच्या कामाचे भुमीपूजन उरण विधानसभेचे माजी आमदार तथा शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख माननीय मनोहरशेठ भोईर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

याप्रसंगी बोलताना माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांनी ग्रामपंचायत फुंडे चे विद्यमान सरपंच सागर घरत तसेच ग्रामपंचायत सदस्या रुचिता प्रितम म्हात्रे,जुईली विश्वजित घरत, कविता केतन म्हात्रे, हर्षा जीवन घरत या सर्व तरुण मंडळीच्या कार्याचे कौतुक केले. तसेच फुंडे गावाच्या विकाससाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत आणि ते स्वतः फुंडे गावाच्या विकास कामासाठी विविध निधीअंतर्गत सहकार्य करण्यात येईल असे निक्षून सांगितले. फुंडे गावातील बहुचर्चित श्री राम मंदिराचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करून या पंचक्रोशीत श्री रामनवमीचा मोठा उत्सव साजरा करण्याचा आम्हा सर्व उरणकरांचा मानस आहे असे सांगितले.

या कार्यक्रमा प्रसंगी शिवसेना उरण विधानसभा संपर्क प्रमुख व कामगार नेते महादेव घरत यांनी देखील फुंडे ग्रामपंचायतचे विद्यमान सुसंस्कृत सरपंच सागर घरत यांचे गावाच्या विकास कामासाठी योजना राबविण्यासाठी वेळोवेळी आम्ही ज्येष्ठ मंडळी मार्गदर्शन तसेच सहकार्य करु असे सांगितले. तसेच सेझ च्या माध्यमातून आपल्या गावातील तरुणांना नोकऱ्या देवून बेकारी कमी करण्यासाठी सहकार्य करण्यात येईल असेही आश्वासन दिले. शेतकरी कामगार पक्षाच्या उरण तालुका महिला अध्यक्षा सीमा घरत यांनी देखील फुंडे ग्रामपंचायतच्या महिला सदस्यांचे कौतुकास्पद उद्गार काढले. या गावातील माझ्या सहकारी महिला या कार्यक्षम तसेच महिलांसाठी रोजगार उपयोगी वेगवेगळे उपक्रम राबवत असतात असे सांगितले. आणि त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच या योजनेसाठी शेकाप चे प्रतोद आस्वाद पाटील यांचे देखील सहकार्य केल्याबद्दल आभार मानले.

या कार्यक्रमासाठी शिवसेना रायगड जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर, फुंडे ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच मिनाक्षी म्हात्रे, ग्रामसुधारणा मंडळाचे अध्यक्ष जीवन घरत, शेकाप चे ज्येष्ठ कार्यकर्ते नितीन ठाकुर, ज्येष्ठ नागरिक दिनकर म्हात्रे गुरुजी, प्रवीण घरत, मुकुंद म्हात्रे, विश्वजीत घरत, प्रकाश ठाकुर, जीवन ठाकुर, किशोर पाटील, विजय वसंतराव घरत,भूषण म्हात्रे,शिवसेना उपशाखाप्रमुख रोहित म्हात्रे, युवासेना अधिकारी रोनित म्हात्रे, डि.एस.म्हात्रे, योगेश म्हात्रे, नरेंद्र म्हात्रे , मनोज म्हात्रे, सुदेश ठाकुर, जगदिश म्हात्रे आणि ईतर ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाप्रसंगी पाहुण्यांचे स्वागत शिवसेना फुंडे चे शाखाप्रमुख प्रितम म्हात्रे यांनी केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवेद्र म्हात्रे तसेच सर्व मान्यवरांचे आभार विद्यमान सरपंच सागर घरत यांनी मानले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.