Press "Enter" to skip to content

वाढदिवसांचे औचित्य साधून राजिप शाळा तळवली येथे विद्यार्थ्यांना वह्या वाटप

सिटी बेल ∆ काशिनाथ जाधव ∆
पाताळगंगा ∆

आज प्रत्येक जण वाढ दिवस वेगवेगळ्या दृष्टीकोणांतून साजरा करीत असतो.मात्र काही व्यक्ती असे आहेत की, आपला वाढदिवस साजरा गोर – गरीब किंवा शाळकरी मुलांच्या मध्ये काही भेट वस्तू देवून साजरा केला जातो. तळवली येथिल असलेले सामाजिक कार्यकर्ते अतुल मालकर यांच्या पत्नी अश्विनी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रायगड जिल्हा परिषद शाळा तळवली येथे विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या.

विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शिक्षणामध्ये गोडी निर्माण व्हावी,शिवाय शाळेमध्ये शिक्षण घेत असलेल्या अनेक विद्यार्थ्यांची घरची स्थिती बिकट असते.यामुळे त्यांच्या शिक्षणासाठी हातभार लावावा या उद्दात हेतुने वह्या वाटप करण्यात आल्या.

यावेळी मुख्याध्यापक- सूर्यकांत चव्हाण,शिक्षका मंगल मुंढे,उपस्थित मान्यवर शालेय व्यवस्थापन कमिटी लक्ष्मी विठोबा जाधव,मंजुळा हरीचंद्र वाघे अदि उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.