सिटी बेल ∆ श्रीवर्धन ∆ केतन माळवदे ∆
श्रीवर्धन येथील, गोखले एज्युकेशन सोसायटीचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे विज्ञान विभागामार्फत २७ जून २०२२ रोजी “जागतिक आमली पदार्थ विरोधी दिवस” साजरा करण्यात आला.
या दिनानिमित्त महाविद्यालयामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी व्याख्यान व पोस्टर प्रदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. व्याख्यानासाठी महाविद्यालयातील प्राणी शास्त्र विभाग प्रमुख प्रा. निलेश चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना आमली पदार्थांचे व्यक्तीच्या आरोग्यावर होणारे शारीरिक मानसिक दुष्परिणाम यावर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमानिमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीनिवास जोशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी वनस्पतीशास्त्र विभागाचे डॉ. विलास वनकटे, रसायनशास्त्र विभागाचे प्रा. वाल्मीक जोंधळे, प्रा. पंकज गमे, श्री. मिलींद काप, श्री. अरूण भगत यांनी विशेष प्रयत्न केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.







Be First to Comment