Press "Enter" to skip to content

३८ लाभार्थींना प्रत्येकी १२५००/- वाटप

वडघर ग्रामपंचायतीच्या वतीने दिव्यांग व्यक्तींना अनुदानाचे वाटप : राजीप शाळेला दिली संगणक आणि प्रिंटर ची भेट

सिटी बेल ∆ पनवेल ∆

वडघर ग्रामपंचायतीच्या वतीने नुकतेच दिव्यांग व्यक्तींना अनुदानाचे वाटप करण्यात आले. तसेच चार जिल्हा परिषद शाळांना संगणक आणि प्रिंटर चे देखील वाटप करण्यात आले.

ग्रामपंचायत वडघर यांच्यावतीने ग्रामपंचायत हद्दीतील दिव्यांग व्यक्तींना प्रत्येकी रुपये १२५००/- वाटप करण्यात आले. सदरची रक्कम धनादेशाद्वारे त्यांना अदा करण्यात आली. ग्रामपंचायत हद्दीतील ३८ लाभार्थींना अनुदानाचे वाटप करण्यात आले.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामासाठी विस्थापित झालेल्या गावांच्यातील रायगड जिल्हा परिषदेच्या ४ शाळा सध्या वडघर ग्रामपंचायत हद्दीमध्ये भरत आहेत. ग्रामपंचायत वडघर यांच्या वतीने सदर शाळांना प्रत्येकी दोन संगणक आणि एक प्रिंटर यांचेदेखील वाटप करण्यात आले. यामध्ये चिंचपाडा, कोपर, वडघर मोहल्ला आणि वडघर बौद्धवाडी या चार शाळांना याचा लाभ होईल.

सदरच्या सोहळ्याला ग्रामपंचायत वडघर चे प्रशासक मुकेश कांबळे, ग्रामविस्तार अधिकारी नंदकिशोर भगत, माजी सरपंच प्रदीप मुंडकर,माजी सरपंच रविकांत भोपी, माजी सरपंच शशिकांत भोईर, माजी सदस्य दीप्ती पाटील आदी मान्यवरांच्या सह ग्रामस्थ लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.