सिटी बेल ∆ पाणदिवे ∆ मनोज पाटील ∆
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या वतीने एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला .या परीक्षेत सु.ए.सोच्या पेण तालुक्यातील रावे येथील सार्वजनिक माध्यमिक विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला असून १००टक्के निकालाची परंपरा गेली सात वर्षे अखंड सूरू ठेवली आहे.
या परीक्षेत सेमी इंग्रजी माध्यमात प्रथम येण्याचा मान मानसी समाधान माळी व सिध्दी सत्यवान पाटील यांनी मिळवीला असून त्यांना ८५.८०टक्के गुण मिळाले आहेत.द्वितीय क्रमांक सिध्दी अनिरूध्द पाटील व ऋतुजा लक्ष्मण पाटी ८३.४० टक्के तर तृतीय क्रमांक रोहीत अनिल पाटील ८१.४० टक्के गुण मिळाले आहेत.मराठी माध्यमात प्रथम क्रमांक मनिष जितेंद्र पाटील ७६.६० टक्के ,द्वितीय क्रमांक सलोनी नवनाथ पाटील ७२.८० टक्के तर तृतीय क्रमांक संजना कमळाकर पाटील ६९.२० टक्के गुण मळाले आहेत .
गुणवंत विद्यार्थ्यांचे ग्रामविकास शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भगवान पाटील,उपाध्यक्ष गजानन पाटील , सचिव अरूण पाटील,खजिनदार कमळाकर पाटील ,मुख्याध्यापक एस.आर.शेंडगे ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ,पालक यांनी अभिनंदन केले आहे.







Be First to Comment