माजी आमदार विवेक पाटील यांच्या जन्मदिनाचे औचीत्याने केले शिबिराचे आयोजन
सिटी बेल ∆ पनवेल ∆
एकच धून एकोणीस जून!!! हा नारा शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांच्यात नवचैतन्य फुलवतो.19 जून अर्थात माजी आमदार विवेक पाटील यांचा जन्मदिन.त्यांच्या जन्मदिनाच्या औचित्याने पनवेलच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉक्टर दत्तात्रय पाटील यांच्या शुभहस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. तर यावेळी शेकाप नेते, माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे आणि मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भाई राजेंद्र पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

माजी आमदार विवेक पाटील हे सध्या राजकीय खेळीचे बळी ठरलेले असून सक्तवसुली संचालनालयाच्या कस्टडी मध्ये ते आहेत. आपल्या जन्म दिनाच्या दिवशी कुठलाही उन्माद न करता तो सामाजिक उपक्रमांच्या द्वारे साजरा केला गेला पाहिजे ही शिकवण माजी आमदार विवेक पाटील यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिली आहे. किंबहुना तशा स्वरूपाचा संस्कार त्यांनी कार्यकर्त्यांवरती घडवला आहे. संघर्ष योद्धा असणारे आमचे साहेब नक्की बाहेर येतील! हा विश्वास पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामनामध्ये फुलत आहे. तूर्तास साहेब जरी कारावास भोगत असले तरी देखील आम्ही त्यांचा जन्मदिवस साजरा करणारच… या संघर्ष वृत्तीने पनवेलच्या कृषी उत्पन्न बाजार समितीने सामाजिक उपक्रमांचाद्वारे माजी आमदार विवेक पाटील यांचा जन्मदिवस साजरा केला.

तेरणा हॉस्पिटल च्या रक्तसंकलन विभागाच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन पनवेलच्या कृषी उत्पन्न बाजार समितीने केले. रक्त संकलन विभागाच्या ब्लड रिस्टोरेशन ऑफिसर डॉक्टर सलोनी दिघे आणि त्यांच्या टीमने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने रक्तदात्यांची तपासणी करून रक्त संकलन केले.

सदरच्या रक्तदान शिबीर उद्घाटन सोहळ्याप्रसंगी पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉक्टर दत्तात्रय पाटील, माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भाई राजेंद्र पाटील, माजी सभापती मोहन कडू, माजी उपसभापती संतोष कृष्णा पाटील, बाजार समितीचे संचालक संतोष पाटील, संचालक तथा आदई ग्रामपंचायतीचे सरपंच रमाकांत गरुडे, प्रकाश पाटील, सुरेश भोईर, सचिव भरत पाटील, विश्वास म्हात्रे, शेतकरी कामगार पक्षाचे माजी तालुका चिटणीस नारायण शेठ घरत, विद्यमान तालुका चिटणीस राजेश केणी, तेरणा ब्लड बँकेचे केसरीनाथ भगत, नितीन पाटील,मेडिकल सोशल वर्कर दत्ता राठोड आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. कृषी उत्पन्न बाजार समिती पनवेल परिसरातील व्यापारी, तोलारी, आडते यांनी सदरच्या शिबिरामध्ये उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवत रक्तदान केले.







Be First to Comment