रोहिदास क्लासेस ची २१ वर्षाची १००% निकाल लावण्याची परंपरा कायम
सिटी बेल ∆ रसायनी ∆ राकेश खराडे ∆
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या इयत्ता दहावी परिक्षेच्या निकालात कु.अनुष्का नंदू कोंकबे हिने ९० टक्के गुण मिळवून सरनौबत नेताजी पालकर शाळेतून व रोहिदास क्लासेस मधून सर्वप्रथम येण्याचा बहुमान प्राप्त केला आहे.
दहावी परीक्षेचा अभ्यास रोहिदास कोचिंग क्लासेस न चुकता रोहिदास ठोंबरे सर यांच्या माध्यमातून १० वीचा अभ्यास,शाळेतील शिक्षक वर्ग आणि आई वडिल व आत्याचं मार्गदर्शन म्हणून मला घवघवीत यश मिळाले असल्याचे अनुष्का हिने सांगितले.
रोहिदास कोचिंग क्लासेस गेली २१ वर्षे ग्रामीण परिसरात विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य करीत आहेत. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही त्यांची १००% निकाल लावण्याची परंपरा त्यांनी कायम ठेवली आहे.विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण देत असतानाच त्यांना गडकिल्ले, संवर्धन याबाबतीत सुद्धा ते मार्गदर्शन करीत असतात.आजपर्यंत त्यांचे मार्गदर्शन घेऊन हजारो विद्यार्थी यशस्वी झाले असून मोठ्या व्यवसाय क्षेत्रात मोठ्या हुद्द्यावर आहेत.नुकत्याच लागलेल्या दहावीच्या निकालात त्यांची विद्यार्थीनी कु.अनुष्का नंदू कोंकबे हिने ९०% काढून घवघवीत यश संपादन केले.तिच्या या दैदिप्यमान कामगिरी बद्दल रोहिदास क्लासेस चे संचालक स्वतः तिच्या घरी जाऊन तिचा शाल व पुष्पगुच्छ देऊन तिचा यथोचित सत्कार केला.

अनुष्काने सामाजिक शास्त्रे विषयात १०० पैकी ९४, हिंदी विषयात १०० पैकी ९३, मराठी विषयात १०० पैकी ८८,इंग्लिश विषयात १०० पैकी ८८,गणित विषयात १०० पैकी ८५ व विज्ञान विषयात १०० पैकी ८२ गुण पटकावले.
तिच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. तिच्या उज्ज्वल शैक्षणिक भविष्यासाठी रोहिदास कोचिंग क्लासेस कडून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.







Be First to Comment