सिटी बेल ∆ पेण ∆ वार्ताहर ∆
नुकताच झालेल्या दहावीच्या बोर्ड परीक्षां मध्ये पेण एज्युकेशन सोसायटीची विद्यार्थिनी शिप्रा भरत साळवी हिने ८३.८० टक्के गुण मिळवून मागासवर्गीय विभागात तिने यश मिळविले आहे.
शिप्राला लहानपणापासूनच शिक्षणाची गोडी असल्याने तीला शाळेच्या मुख्याध्यापकांपासून ते इतर शिक्षकांपर्यंत तसेच आपल्या आई-वडिलांकडून वेगवेगळ्या पद्धतीचे शिक्षण धडे मिळत गेल्याने तिने तिच्या मेहनतीच्या जोरावर ती वर्षभर सातत्याने अभ्यास करीत राहिली त्यामुळेच हे यश तीला संपादित करता आले. पेण तालुका चर्मकार समाजाचे अध्यक्ष आणि जिल्हा चर्मकार संघटनेचे उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते भरत जनार्दन साळवी यांच्या मुलगी शिप्रा साळवी हिने मिळविलेल्या या यशाबद्दल तिचे शाळेच्या तसेच समाज यासह सामाजिक धार्मिक व शैक्षणिक संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे.







Be First to Comment