जोहे विभागातील मुलांचा शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी स्कूलची निर्मिती – बापूसाहेब नेने
सिटी बेल ∆ पेण ∆ वार्ताहर ∆
पेण तालुक्यातील नामवंत डॉक्टर शेखर धुमाळ यांच्या जोहे येथील के.एस.डी. इंग्लिश मिडीयम स्कूलचे नुकतेच पेण शिक्षण महर्षी बापूसाहेब नेने यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी पेण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲड. मंगेश नेने, कोनायन्स स्कूलचे सदस्य प्रकाश गुरव, केएसडी एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष काशिनाथ पाटील, सचिव ॲड. पुष्कर मोकल, खजिनदार कांचन धुमाळ, सदस्य देवा पेरवी आदिंसह शिक्षक कर्मचारी व पालक वर्ग मोठ्या संख्येने संख्येने उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना बापूसाहेब नेने म्हणाले की, डॉ. धुमाळ कुटुंबियांनी एक चांगला संकल्प सोडला असून या भागात असणा-या मुलांना इंग्रजी शिक्षण घेण्यात यावे याकरिता हा प्रामाणिक प्रयत्न करून येथील मुलांनी शिक्षणात नाविन्यपूर्ण कामगिरी करावी असे बोलून शिक्षण संस्था चालविण्यासाठी अनेक अडचणी येतात परंतु आपले ध्येय चांगले असले की आपोआप आपल्याला मार्ग मिळत जातो त्यामुळे या संस्थेत येथील मुले इंग्रजी शिक्षण घेऊन आपले नांव कमावतील असे त्यांनी शेवटी सांगितले.
तर शिक्षण क्षेत्रात मराठी सोबतच इंग्रजीचे ज्ञान असणे गरजेचे आहे.भविष्यात मुलांच्या रोजगार निर्मितीसाठी कोणतीच अडचण येऊ नये.अनेक अडचणी आल्या तरी मात्र ही संस्था कायम या भागाच्या मुलांसाठी काम करीत राहणार असल्याचे डॉ. शेखर धुमाळ यांनी सांगितले.







Be First to Comment