सिटी बेल ∆ श्रीवर्धन ∆ केतन माळवदे ∆
नुकताच मुंबई विद्यापीठाने कला शाखेच्या पदवी परिक्षेचा निकाल जाहीर केला असून,श्रीवर्धन येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कला शाखेच्या पदवी परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
गुणानुक्रमे सौ. सुविधा चांदरकर ही विद्यार्थीनी प्रथम आली असून , वैभव पोवळे हा द्वितीय तर कु. गौतमी राऊत त्रृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत, महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. श्रीनिवास जोशी यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून महाविद्यालयाने स्थापनेपासूनच निकालाची उत्कृष्ट परंपरा जोपासली असल्याचे म्हटले आहे. महाविद्यालयाचे हे रौप्य महोत्सवी वर्ष असून या प्रसंगी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत महाविद्यालयाच्या कला शाखेत अर्थशास्त्र, इतिहास व मराठी या विषयात विद्यार्थ्यांना पदवी प्राप्त करता येते.
या विद्यार्थ्यांना इतिहास विषयासाठी प्रा. किशोर लहारे, अर्थशास्त्र विषयात प्रा. योगेश लोखंडे तर मराठी विषयात प्रा. संतोष लंकेश्वर यांचे मार्गदर्शन लाभले उत्कृष्ट निकाल लागल्यानंतर श्रीवर्धन तालुक्यातील पालक वर्गातून समाधान व्यक्त करुन विद्यार्थी व महाविद्यालयाचे अभिनंदन करण्यात येत आहे.







Be First to Comment