सिटी बेल लाइव्ह / रसायनी–राकेश खराडे
चौक ग्रामपंचायतीच्या रिक्त सरपंच पदावर शिवसेना सदस्य कल्याणी किशोर थळकर यांची बिनविरोध निवड झाल्याने चौक शिवसेनेत चैतन्य निर्माण झाले असून नवनिर्वाचित सरपंचावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
ग्रुप ग्रामपंचायत चौक ही मोठी ग्रामपंचायत असून सरपंच सारिका चौधरी यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सरपंच पदाची आज निवडणूक निर्णय अधिकारी नितीन परदेशी यांच्या अधिपत्याखाली निवडणूक झाली.सरपंच पदाचा एकमेव अर्ज आल्याने त्या बिनविरोध निवडून आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहीर केले.
यावेळी चौक शिवसेना विभागप्रमुख सुधीर ठोंबरे,जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे,वासांबे मोहोपाडा विभागप्रमुख अजित सावंत, सुनिल गायकवाड यांनी त्यांचे अभिनंदन केले.यावेली शिवसेनेचे पदाधिकारी,ग्रामपंचायत सदस्य,शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धवठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत काम करताना व विभागप्रमुख सुधीरशेठ ठोंबरे व जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना सर्वप्रथम कोरोना पासून हा परिसर मुक्त करण्यासाठी प्रयत्न करू,दिलेली जबाबदारी शिवसेनेच्या माध्यमातून पूर्ण करीन असे त्यांनी सांगितले. तंटामुक्ती अध्यक्ष मनोहर देशमुख,संजय कोंडीलकर,सारिका चौधरी,प्राची आंबवणे,कविता कोंडीलकर,लता कोंडीलकर,राजन गावडे,गणेश कदम जेष्ठ कार्यकर्ते देशमुख उपस्थित होते.निवडणूक सहाय्यक म्हणून ग्रामविकास अधिकारी जाधव यांनी काम पाहिले.
Be First to Comment