वडाळे तलाव परिसर स्वच्छतेसाठी सरसावल्या पनवेलच्या स्मार्ट मम्मिज
सिटी बेल ∆ पनवेल ∆
वडाळे तलावाच्या सुशोभीकरणानंतर हा परिसर पनवेलचा मानबिंदू ठरत आहे. शुद्ध हवा मिळविण्यासाठी निसर्गाच्या सान्निध्यात येणारे, फिरायला येणारे, व्यायामासाठी येणारे चार क्षण विरुंगळ्याचे शोधत येणारे अशांची येथे गर्दी होत असते परंतु त्यामुळे येथे कचरा देखील होत असतो.
पनवेलच्या वडाळे तलावाचा परिसर म्हणजे हल्ली वाढदिवस साजरा करण्यासाठी हॉट स्पॉट बनत आहे. रात्रीचे बारा अगदी दिवसाच्या कुठल्याही वेळी वाढदिवस साजरा करणारे,अल्पोपहार करणारे सर्रास दिसतात.त्यांचा कचरा मात्र यत्र तत्र सर्वत्र पसरला असतो. कचरा संकलनाकरता कचराकुंड्या नसल्याने ही परिस्थिती उद्भवते.

येथील परिसर स्वच्छ राहावा या उदात्त हेतूने पनवेलच्या स्मार्ट मम्मी या सेवाभावी संस्थेच्या वतीने सहा कचराकुंड्या या परिसरामध्ये ठेवण्यात आल्या आहेत.
नुकताच तलाव परिसरात कचराकुंड्या ठेवण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. तलाव परिसरात संस्थेच्या वतीने सहा कचराकुंड्या विविध ठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत.
पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे, नगरसेविका प्रीती जॉर्ज म्हात्रे पनवेल स्मार्ट मम्मीच्या संस्थापिका आणि अध्यक्षा शीतल ठक्कर,डॉ.निलेश बाठिया आदींची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना प्रीतम म्हात्रे यांनी पनवेल स्मार्ट मम्मीने घेतलेल्या पुढाकाराबद्दल त्यांची प्रशंसा केली. अनेक सेवाभावी उपक्रमांच्यात पनवेल स्मार्ट मम्मीज ही संस्था हिरीरीने सहभागी होत असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. तसेच नाविन्यपूर्ण व अनोखे उपक्रम राबविण्यासाठी ही संस्था प्रसिद्ध असल्याचे म्हटले. शितल ठक्कर आणि त्यांच्या सार्या सहकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले.
यावेळी पनवेल स्मार्ट मम्मीच्या सदस्य कविता ठाकूर, नयना बांठीया, मेघना भानुषाली, देविका जैन, कोमल विरा, प्रीती निसर, नेहा गांधी, मंगल गांधी, सूएषा गांधी मोना जैन, कीर्ती मुनोथ उपस्थित होत्या.
हा आमचा प्रायोगिक उपक्रम असून पनवेल मधील सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ राहिले पाहिजेत हा आमचा प्रामाणिक हेतू आहे. यानंतर आम्ही कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी बाहेरील रस्ते, जेथे सकाळी व्यायामासाठी, मॉर्निंग वॉक साठी, जॉगिंग साठी, लाफ्टर क्लब साठी अनेक लोक येत असतात त्या परिसरात कचराकुंड्या ठेवणार आहोत. – पनवेल स्मार्ट मम्मीच्या संस्थापिका आणि अध्यक्षा शीतल ठक्कर








Be First to Comment