रायगड गोरेगाव जवळ 25 जणांचे रेस्क्यु टिम ने वाचविले प्राण
सिटी बेल लाइव्ह / रायगड (धम्मशिल सावंत)
रायगड जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.अशातच येथील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. माणगाव तालुक्यातील काळ नदीला पुर आल्यामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी भरले. काळ नदीच्या किनारी धरणाजवळ असलेल्या फार्म हाऊस वर अडकलेल्या 25 नागरिकांना रेस्क्यु केले गेले.
रोहा तालुक्यातील महेश सानप यांच्या रेस्क्यु टिम ने जलदगतीने कार्यवाही करीत एका बोटीने तीन फेऱ्या मारुन 25 जणांचे प्राण वाचविले.






Good local content