Press "Enter" to skip to content

१६ ते १८ मुले शिक्षणापासून वंचित

राजिप शाळा ईसाळवाडी पुन्हा सुरु करण्यासाठी गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन

सिटी बेल ∆ काशिनाथ जाधव ∆
पाताळगंगा ∆

चौक या बाजार पेठेच्या ठिकाणांहून ४ की.मी असलेल्या डोंगराच्या पायथ्याशी असलेली ईसाळवाडी आहे.मात्र आज मुले शाळेय शिक्षणांपासून वंचित आहे. या ठिकाणी रायगड जिल्हा परिषद ची शाळा होती. मात्र पटसंख्या घटल्यामुळे ती बंद करण्यात आली.मात्र आज त्या वाडी मध्ये जवळ – जवळ १६ ते १८ मुले शिक्षणांपासून वंचित असल्यामुळे त्या ठिकाणी असलेली शाळा पुन्हा सुरु करण्यासाठी ग्रामस्थ आणी शिक्षक संघटनेच्या माध्यमातून गट शिक्षणाधिकारी चोरमले यांस निवेदन देण्यात आले.

आपल्या मुलांना शाळेय शिक्षण मिळावे.त्यांनी अशिक्षित राहु नये.मात्र गावापासून असलेली शाळा खूप लांब असून,विद्यार्थ्यांना रोज चालत जाणे शक्य नाही.शिवाय पालकांची स्थिती उत्तमच असते नाही.यामुळे बंद पडलेली शाळा सुरु झाल्यास चौक सारख्या ठिकाणी न येता गावातच त्यांना शिक्षण मिळाल्यास येथिल मुले शाळेपासून वंचित राहणार नाही. यासाठी पालक वर्ग,शिक्षक संघटना एकत्र आले.असून तेथिल मुलांना शिक्षण मिळावे हाच या मागील उद्दिष्टे असल्यांचे त्यांनी प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.

शिक्षणांपासून वंचित असलेली मुले त्यांना सुद्धा शिक्षण मिळावे या उद्दात विचारांतून मोतीरामशेठ ठोंबरे यांनी शाळा सुरु करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत असून आपण पालक आणी विद्यार्थी यांच्या सोबत असून शाळा सुरु करण्यासाठी आश्वासन येथिल ग्रामस्थांना दिले आहे.त्याच बरोबर केंद्र प्रमुख यांनी विद्यार्थी पट संख्या व्यवस्थित असून शाळा सुरु होण्यांस काही हरकत नसल्यांचे त्यांनी सांगितले.

यावेळी पंचायत समिती सदस्य-खालापूर – कमलताई भस्मा,सामाजिक कार्यकर्ते – कमळू पारधी,जैतु पारधी,बुध्या पारधी, बामा पारधी,रमेश भवर,प्रविण पारधी,यशवंत दोरे, पांडुरंग पारधी,जैतु पारधी,अंकुशभाऊ वाघ,शिक्षक सेना अध्यक्ष,जितेंद्र ठाकूर,विस्तार अधिकारी – पाडवी पालवे सर, बस्वराज स्वामी,दिपक ठाकूर,अमित मिडगुले,विश्वास सावळे,संदीप सुर्वे, तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रदिप गोंधळी, ग्रुप ग्रामपंचायत प्रशासन अधिकारी,तांडेल,राजेश देशमुख अदि उपस्थित होते.

कालच मला ईसाळवाडी येथे शाळा सुरु करण्यासाठी शिक्षक, पालक,सामाजिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून निवेदन आले असून या माध्यमातून सकारात्मक विचार केले जावून या संदर्भात पुर्ण तपशिल जाणून घेवून शाळा सुरु होण्यासाठी प्रयत्न केले जाईल ‌ ‌ – खालापूर गट शिक्षणाधिकारी चोरमले

ईसाळवाडी या आदिवासी वस्तीमध्ये शाळा पुन्हा सुरू व्हावी व सर्व मुलांना प्राथमिक शिक्षण मिळावे,यासाठी गावातील जेष्ठ नागरिक म्हणून शासनाकडे विनंती अर्ज केले आहे. ‌ ‌ ‌ – कमळू पारधी,जैतु पारधी

शिक्षक विद्यार्थ्यांना घडवित असतात.मात्र त्या साठी ईसाळवाडी येथे शाळा सुरु होणे गरजेचे आहे.मात्र डोंगराळ भागात राहत असणारे लहान मुले यांना चौक या ठिकाणी जाणे शक्य नसल्यामुळे शिवाय पट संख्या वाढली असल्यामुळे आम्ही गटशिक्षणाधिकारी यांच्या कडे शिक्षक संघटनेच्या माध्यमातून निवेदन दिले आहे ‌ ‌ ‌ – जितेंद्र अनंत ठाकूर ,अध्यक्ष खालापूर तालुका शिक्षक सेना

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.