Press "Enter" to skip to content

चौक वनविभागाच्या मोकळ्या जागेत वृक्षारोपण

सिटी बेल ∆ रसायनी ∆ राकेश खराडे ∆

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त चौक, खालापूर, कर्जत वन विभागाच्या विद्यमानातून चौक येथे फॉरेस्ट ऑफिस समोरील मोकळ्या जागेत वृक्ष रोपण व त्याचे संवर्धन करण्यात आले.

पर्यावरण आणि अर्थव्यवस्था या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत . पर्यावरणाचे संवर्धन केले नाही तर आपण स्वतः चा बचाव करू शकणार नाही. पृथ्वीचे वातावरण 7400 कोटी टनाहून अधिक कार्बन वायुने व्यापलेले आहे. केवळ कार्बन डायॉक्साईड नव्हे तर मानवी कृत्यामुळे मिथेन चेही वातावरणातील प्रमाण वाढत आहे.

मिथेन हा कार्बन डायऑक्साइड पेक्षा 21 पटीने जहाल वायू मानला जातो. हेवेतील कार्बन डायऑक्साइड वाढत्या प्रमाणमुळे पृथ्वी वरील तापमान वाढ होत आहे ह्या मुळे पृथ्वी च्या पृष्ठ भागाच्या सरासरी तापमानात सुमारे 1.8 अंश सेल्सिअस एवढी वाढ झाली आहे. ह्या तापमान वाढ मुळे अतिवृष्टी , उष्णतेच्या लाटा , दुष्काळ , महापूर, वादळ, भूजलाचा स्तर खालावत आहे .भविष्यात पृथ्वी वरील जीव मानव जातीचे अस्तित्व नष्ट होवू शकते आशी भीती वर्तवली जाते.

यावेळी असंख्य ,सामजिक कार्यकर्ते , लोक प्रतिनिधी सेवा भावीस्थेचे पदाधिकारी, वृक्ष प्रेमी , नागरीक वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.