Press "Enter" to skip to content

स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या ८ व्या पुण्यस्मरणानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

सिटी बेल ∆ कामोठे ∆

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तसेच जय गोपीनाथ प्रतिष्ठान कामोठे यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या ८ व्या पुण्यस्मरणानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन श्री.संत शिरोमणी तुकाराम महाराज मंदिर, कामोठे याठिकाणी करण्यात आले होते.

यावेळी स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करण्याहेतुपुरस्सर विविध कार्यक्रमांचे आयोजन करून मुख्यतः आचार्य श्री.ह.भ.प प्रल्हाद महाराज शास्त्री, मलंगगड यांचे हरीपाठ तसेच सुप्रसिद्ध कीर्तनकार श्री.ह.भ.प डॉ. सुदाम महाराज पानेगावकर यांचे कीर्तन कार्यक्रम पार पडले. या कार्यक्रमात स्व. गोपीनाथ मुंडे यांना मानणारा तसेच त्याच्यांवर प्रेम करणारा सर्व समाजातील जनता मोठ्या संख्येने त्यांना अभिवादन करण्यासाठी जमला होता.

या कार्यक्रमास लोकनेते रामशेठ ठाकूर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबई प्रभारी प्रशांत पाटील, सूरदास गोवारी, सुदाम पाटील, सतिश पाटील, जगदीश गायकवाड, अॅड. पवन गायकवाड, चंद्रकांत नवले, स्वप्निल काटकर, बबनराव पवार, सौ. संगीता पवार, सौ. जयश्री देसाई, महेंद्र पाटील, राहुल यादव आदि मान्यवरांनी प्रामुख्याने उपस्थिती लावली.

कार्यक्रमाचे आयोजन किशोर वसंत मुंढे – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कामोठे शहर कार्याध्यक्ष, सुभाष आंधळे – अध्यक्ष जय गोपीनाथ प्रतिष्ठान, अनंत वारे – रा. काँ. पा उपाध्यक्ष, बबनराव बारगजे – प्रतिष्ठान सल्लागार, मोहन तोंडे – रा.काँ.पा उपाध्यक्ष, हनुमंत विघ्ने – प्रतिष्ठान सचिव आदींद्वारे करण्यात आले होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.