उमठे धरणावर अवलंबून असणार्या 65 गावांना टँकरने पाणी पुरवठा करण्याची भाजपाची प्रांताधिकारी यांच्याकडे मागणी
सिटी बेल ∆ अलिबाग ∆ अमूलकुमार जैन ∆
रायगड जिल्ह्यातील अनेक गावांना सध्या भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतो आहे, काही ठिकाणी धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्तिती दिसून येत आहे. उमटे धरणातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे ? त्याचप्रमाणे उमटे धरणातील पाणी हे अत्यंत दूषित आणि पिण्याअयोग्य पाणी सध्या धरणात उपलब्ध आहे.त्यामळे उमटे धरणावर अवलंबून असणाऱ्या 65 गावांना टँकरने पाणी पुरवठा करण्यात यावा अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे दक्षिण जिल्हाध्यक्षऍड महेश मोहिते यांनी अलिबाग येथील उपविभागीय अधिकारी (प्रांत) यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.यावेळी प्रांत अधिकारी यांना उमटे धरणातील दूषित पाण्याने भरलेली बाटली देण्यात आली.

उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की,अलिबाग तालुक्यातील रामराज ग्रामपंचायत हद्दीत उमटे धरणातून पाणीपुरवठा होत आहे.उमटे धरणाची पाण्याची पातळी खूप कमी झाल्यामुळे या धरणावर अवलंबून असणाऱ्या गावातील पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे .तसेच शिल्लक असलेले पाणी हे अत्यंत दुषित व पिण्याअयोग्य आहे.
उमटे धरण हे मागील सन 2016-17 पासून उमटे धरणाचा गाळ काढून धरणाच्या संरक्षण भिंतीची भगदाडे भरावीत यासाठी उमठे धरण क्षेत्रातील ग्रामस्थांनी शासनाला वारंवार विनंती अर्ज दिले.असल्याची माहिती मोहिते यांनी दिली.

मात्र शासनाने नकारात्मकतेची भूमिका घेवून धरणाचा गाळ न काढता लोकांच्या भावनेची चेष्टाच केली आहे. याठिकाणी शासनाच्या जलजीवन मिशनची ऐशी की तैशी झालीय.प्रत्येक नागरिकाला दैनंदिन शुद्ध व मुबलक पाणीपुरवठा करण्याचा शासन आदेश इथं धुळीत मिळालाय. आपल्या समस्या व ज्वलंत पाणी प्रश्नाबाबतीत रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन दूषित पाण्याबाबत ची समस्या मांडली आहे..
सध्या उमटे धरणाच्या पाण्यावर धरणालगतची 65 गावे अवलंबून आहेत. उमटे धरण हे रायगड जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येते. मात्र राजकीय व शासकीय उदासीनतेमुळे धरणात मागील 40 ते 45 वर्षांपासून गाळ तसाच साचलेला आहे.

तरी या धरणावर अवलंबून असणाऱ्या गावांना त्वरित टँकरने पाणीपुरवठा करावा अशी मागणी केली असता उपविभागीय अधिकारी प्रशांत ढगे यांनी सांगितले की तहसीलदार यांना सूचना देऊन तेथील पाहणी करून लवकरच टँकर सुरू होऊन जनतेचे पाण्याअभावी होणारे हाल थांबविण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.
यावेळी मोहिते यांच्या समवेत ओबीसी जिल्हाध्यक्ष जगदीश घरत,आदीसाहित भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.








Be First to Comment