सिटी बेल ∆ श्रीवर्धन ∆ केतन माळवदे ∆
येथील गोखले एज्युकेशन सोसायटीचे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय श्रीवर्धन मध्ये सोमवार दि ०६ जुन रोजी शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने व शासकीय परिपत्रकानुसार शिव सुराज्य दिन साजरा करण्यात आला, सकाळी १०:३० वाजता अकाऊंट विभागाचे प्रमुख, प्रा. राजु गोरुले यांचे हस्ते शिव प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, याच दिवशी छत्रपतींच्या सुराज्याच्या विविध विषयांवर निबंध स्पर्धा व रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
याशिवाय म्हसळा येथील वसंतराव नाईक, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या इतिहास विभागाचे प्रमुख, डॉ. संजय बेंद्रे सर यांचे
‘ रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज’ या विषयावर आॅनलाईन व्याख्यान ठेवण्यात आले होते.

छत्रपतींच्या सुराज्याच्या विविध विषयांना स्पर्श करून अतिशय छान व्याख्यान संपन्न झाले. शिवसुराज्य दिनाच्या या कार्यक्रमाला प्राचार्य, डॉ श्रीनिवास जोशी यांचे मार्गदर्शन लाभले, कार्यक्रमांचे प्रास्ताविक प्रा .वाल्मिक जोंधळे यांनी केले तर प्रा. किशोर लहारे यांनी आभार प्रदर्शन केले या कार्यक्रमाला विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.








Be First to Comment