Press "Enter" to skip to content

आदर्श लोकसेवक पुरस्कार सोहळा संपन्न

पालकमंत्री आदिती ताई तटकरे यांच्या शुभहस्ते प्रभुदास भोईर यांना सिटी बेल वृत्त समुहाचा “आदर्श लोकसेवक” पुरस्कार प्रदान

सिटी बेल ∆ पनवेल ∆ प्रतिनिधी ∆

अल्पावधीतच वाचकांच्या मनावर रुंजी घालणाऱ्या सिटी बेल वृत्त समूहाच्या वतीने असामान्य व आदर्श लोकसेवक पुरस्कार सोहळ्याचे शुक्रवार दिनांक 3 जून रोजी सायंकाळी आयोजन करण्यात आले होते. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती ताई तटकरे यांना या पुरस्कार सोहळ्यात असामान्य लोकसेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.खासदार श्रीरंग (अप्पा) बारणे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांच्यासमवेत आमदार प्रशांत ठाकूर, आमदार बाळाराम पाटील, रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र घरत,पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आर सी घरत, शिवसेनेचे रायगड जिल्हा सल्लागार तथा प्रवक्ते बबनदादा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रशांत भाऊ पाटील, शिवसेनेचे महानगरप्रमुख रामदास शेवाळे प्रमुख अतिथी म्हणून मंचावर विराजमान होते. पनवेलच्या विरुपाक्ष हॉल येथे हा शानदार सोहळा संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला सिटी वृत्त समूहाचे समूह संपादक मंदार दोंदे यांनी प्रास्ताविक सादर केले. त्यानंतर पुरस्कार प्राप्त प्रभूतींचा अल्पपरिचय करून देणाऱ्या सिटी बेल विशेषांकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन संपन्न झाले.

समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असणाऱ्या व सातत्याने जनसेवेसाठी झोकून देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा सिटी बेल च्या वतीने आदर्श लोकसेवक देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये खिडुकपाडा येथील प्रभुदास भोईर उर्फ अण्णा यांना वाहतूकदार व माथाडी कामगार या क्षेत्रात ते करत असलेल्या अतुलनीय कार्याबद्दल आदर्श लोकसेवक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पालकमंत्री आदिती ताई तटकरे यांच्या शुभ हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रभुदास भोईर हे शेतकरी कामगार पक्षाच्या वाहतूकदार सेलचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आहेत. तसेच ते महाराष्ट्र राज्य माथाडी अँड जनरल कामगार युनियन चे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष देखील आहेत. त्यांच्यासमवेत महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार अँड जनरल कामगार युनियन चे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बाळासाहेब बोरकर यांना देखील आदर्श लोकसेवक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

सिटी बेलचे समूह संपादक विवेक मोरेश्वर पाटील यांनी कार्यक्रमाचे अंती आभार प्रदर्शन सादर केले.

सिटी बेल वृत्त समूहाने या सोहळ्यासाठी खास स्वतःचे सन्मानचिन्ह बनवून घेतले होते. किल्ले रायगडावर होळीचा माळ येथे असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनावर विराजमान झालेल्या पुतळ्याची प्रतिकृती सन्मान चिन्ह म्हणून प्रदान करण्यात आली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.