Press "Enter" to skip to content

मॉन्सूनपूर्व कामे वेगाने सुरु

सभागृहनेते परेश ठाकूर यांनी पाहणी करुन घेतला आढावा

सिटी बेल ∆ पनवेल ∆

पनवेल महापालिका हद्दीत मॉन्सूनपूर्व कामे वेगाने सुरु आहेत. त्यापाइर्श्वभुमीवर कोयनावेळे आणि सिद्धी करवले या स्मार्ट व्हिलेज मध्ये नाले सफाईच्या कामाची तसेच गावात सुरु असलेल्या रस्ते आणि गटारांच्या कामाची सभागृहनेते परेश ठाकूर यांनी पाहणी करुन आढावा घेतला. तसेच या कामांसंदर्भात अधिकाऱ्यांना आवश्यकत्या सूचना दिल्या.

या वेळी स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, नगरसेवक संतोष भोईर, दिनेश केणी, युवानेते समीर कदम, रवि म्हात्रे, खारघर तळोजा मंडळ उपाध्यक्ष निर्दोश केणी, गोपीनाथ पाटील, संतोष मढवी, शहर अभियंता संजय कटेकर, श्री साळुंखे, जयराम कदम, कोयनावेळेचे माजी सरपंच विनेश कदम, नरेश कदम यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.