Press "Enter" to skip to content

डोंगरी-शेणवई येथील कबड्डी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

जिल्हास्तरीय आमदार चषक कबड्डी स्पर्धेचा नवयुवक धाटाव संघ मानकरी

सिटी बेल ∆ नागोठणे ∆ महेश पवार ∆

रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन व रोहा तालुका कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय आमदार चषक – २०२२ या भव्य कबड्डी स्पर्धेत नवयुवक धाटाव संघाने श्री गणेश कासू संघाचा पराभव करून आमदार चषकावर आपले नाव कोरतानांच रु. ३३ हजारांचे रोख पारितोषिक पटकावले. तर कासू संघाला चषक व रु. २१ हजारांच्या रोख पारितोषिकासह द्वितीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. तसेच नवतरुण तळाघर व काळभैरव उददवणे या संघांना अनुक्रमे तृतीय व चतुर्थ क्रमांकाचे चषक व रु. ११ हजारांचे रोख पारितोषिक देण्यात आले.

याशिवाय स्पर्धेत उत्कृष्ट खेळाडू ठरलेला नवयुवक धाटाव संघाचा खेळाडू अजय मोरे याला सायकल बक्षीस देण्यात आली. तसेच उत्कृष्ट पकडीसाठी दीपक कासारे व उत्कृष्ट चढाईसाठी रोषण तांडेल यांना कुलर स्वरूपात बक्षीस देण्यात आले.

शेणवई-भातसई विभाग शिवसेना व युवासेना आणि अॅड. मनोजकुमार नारायण शिंदे प्रतिष्ठान यांच्या वतीने डोंगरी-शेणवई येथील आप्पा चायनीज सेंटर समोरील मैदानात संपन्न झालेल्या या स्पर्धेला कबड्डीप्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी अॅड. मनोजकुमार शिंदे, शिवसेना रोहा तालुका प्रमुख समीर शेडगे, भातसई विभाग प्रमुख संतोष खेरटकर आदींसह शिवसेनेचे रोहा तालुक्यातील व भातसई विभागातील अनेक पदाधिकारी व अनेक मान्यवर उपस्थित होते.

अॅड. मनोजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या संपन्न झालेल्या या कबड्डी स्पर्धेदरम्यान अलिबाग-मुरुडचे आमदार महेंद्रशेठ दळवी, महाड-पोलादपूरचे आमदार भरतशेठ गोगावले, अॅड. अविनाश भगत आदींसह अनेक मान्यवरांनी भेट देऊन स्पर्धेचे व आयोजकांचे कौतुक केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.