Press "Enter" to skip to content

धरण उशाला आणि कोरड घशाला

उमठे धरणावर अवलंबून असणार्‍या 65 गावांना होतोय दुषित व दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा

गुरे ढोरे पिणार नाहीत इतका घाण व दुषित होतोय पाणी पुरवठा

शासनाच्या जलजीवन मिशनची ऐशी की तैशी : नागरिकांच्या आरोग्य व जिवीताचा प्रश्न गंभीर

शुद्ध व मुबलक पाणीपुरवठा करण्याची मागणी : अन्यथा….पाणी प्रश्नावर उग्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा

सिटी बेल ∆ अलिबाग ∆ अमूलकुमार जैन ∆

रायगड जिल्ह्यातील अनेक गावांना सध्या भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतो आहे, काही ठिकाणी धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्तिती दिसून येत आहे. उमटे धरणातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

उमटे धरण हे मागील सन 2016-17 पासून उमटे धरणाचा गाळ काढून धरणाच्या संरक्षण भिंतीची भगदाडे भरावीत यासाठी उमठे धरण क्षेत्रातील ग्रामस्थांनी शासनाला वारंवार विनंती अर्ज दिले. मात्र शासनाने नकारात्मकतेची भूमिका घेवून धरणाचा गाळ न काढता लोकांच्या भावनेची चेष्टाच केली आहे. असे संतप्त ग्रामस्थानी म्हटले. याठिकाणी शासनाच्या जलजीवन मिशनची ऐशी की तैशी झालीय.प्रत्येक नागरिकाला दैनंदिन शुद्ध व मुबलक पाणीपुरवठा करण्याचा शासन आदेश इथं धुळीत मिळालाय. आपल्या समस्या व ज्वलंत पाणी प्रश्नाबाबतीत जिल्हाधिकारी रायगड , मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद, आमदार महेंद्र दळवी, पालकमंत्री तटकरे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष आस्वाद पाटील, शेकाप नेत्या चित्रलेखा पाटील तसेच मुख्य कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा विभाग रायगड जिल्हा परिषद यांना देण्यात आल्या आहेत. मात्र आजही या धरणाच्या गाळ उपसा व शुद्ध पाणीपुरवठा प्रश्नावर संवेदनशिल ता दिसून येत नाही. मागणीची जलद पूर्तता करावी अन्यथा….इथल्या पाणी प्रश्नावर उग्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थानी दिलाय.

सध्या उमटे धरणाच्या पाण्यावर धरणालगतची 65 गावे अवलंबून आहेत. उमटे धरण हे रायगड जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येते. मात्र राजकीय व शासकीय उदासीनतेमुळे धरणात मागील 40 ते 45 वर्षांपासून गाळ तसाच साचलेला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.