Press "Enter" to skip to content

ॲड. मनोजकुमार शिंदे प्रतिष्ठान तर्फे आयोजन

शेणवई येथे रंगणार जिल्हास्तरीय आमदार चषक कबड्डी स्पर्धेचा थरार

सिटी बेल ∆ नागोठणे ∆ महेश पवार ∆

रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन व रोहा तालुका कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने जिल्हास्तरीय आमदार चषक – २०२२ या भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन रविवार दि. २२ मे रोजी शेणवई-भातसई विभाग शिवसेना व युवासेना आणि अॅड. मनोजकुमार नारायण शिंदे प्रतिष्ठान यांच्या वतीने डोंगरी-शेणवई येथील आप्पा चायनीज सेंटर समोरील मैदानात करण्यात आले असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड. मनोजकुमार शिंदे यांनी दिली.

या भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेतील विजेत्या संघास रु. ३३ हजारांचे रोख पारितोषिक व आकर्षक आमदार चषक, उपविजेत्या संघास रु. २१ हजारांचे रोख पारितोषिक व आकर्षक चषक तर तृतीय व चतुर्थ क्रमांक मिळविणाऱ्या संघास प्रत्येकी ११ हजार व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. याशिवाय या कबड्डी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेलाडूस सायकल देऊन गौरविण्यात येणार आहे. तर उत्कृष्ट चढाई, उत्कृष्ट पकड व पब्लिक हिरो ठरणाऱ्या खेळाडूंना कुलर स्वरूपात बक्षीस देण्यात येणार आहे.

या भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या हस्ते सायंकाळी ४ वाजता संपन्न होणार आहे. कबड्डी स्पर्धेच्या या उद्घाटन सोहळ्यास शिवसेना जिल्हाप्रमुख, आमदार महेंद्रशेठ दळवी, आमदार भरतशेठ गोगावले, आमदार महेंद्रशेठ थोरवे, शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल नवगणे, राजिपचे विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे, अॅड. मनोजकुमार शिंदे, शिवसेना रोहा तालुका प्रमुख समीर शेडगे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या भव्य कबड्डी स्पर्धेला कबड्डीप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.