जंगलातील रानमेवा बाजार पेठेत दाखल
सिटी बेल ∆ काशिनाथ जाधव ∆
पाताळगंगा ∆
दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत आसल्यामुळे प्रत्येक नागरिकांची अंगाची लाही -लाही होत आहे.या उन्हाच्या चटक्या पासून थकवा कमी व्हावे,यासाठी निसर्गाने या ऋतूमध्ये रसाळ फळे व रानमेवा ची निर्माण केली असावी.यामुळे बाजारात पेठेच्या ठिकाणी जंगलातील रानमेवा दाखल झाले असून हा खरेदी करण्याचा नागरिकांचा कल मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.
उन्हाळ्याचे आगमन होताच हा रानातील रानमेवा बाजारात आल्याने यामध्ये करवंदे ,कैरी , अंजीर ,काजू, चिंच जांभळे, अदि जंगलामध्ये तयार झालेला रानमेवा मोहपाडा , खोपोली , चौक या बाजारात दाखल झाले आहे.
या रानमेवा मुळे आदिवासी या समाज्याला रोजगार मिळत असतो. तसेच रानातील काळी मैना तयार झाली.प्रत्येक जण आवर्जून खरेदी करीत आहेत शिवाय रुचकर, स्वस्त आणि औषधी असे बहुउपयोगी असलेल्या या रानमेव्याची अनेकांनी भुरळ पडत आहे.
दुर्गम भागात राहणारे अदिवासीं बांधवांचे उत्पन्नाचे साधन म्हणून डोंगरातील रानमेवा असून उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पटकन तोंडात टाकता येणारा तसेच शरीराला आणि मनाला गारवा देणार्या या रानमेव्याला अधिक मागणी दिसत आहे.उन्हाळ्यामुळे निर्माण झालेली उष्णता आणि वातावरणातील बदल यामुळे शरीराला थकवा येतो. तो दूर करण्यासाठी, उन्हापासून रक्षण व्हावे यासाठी विविध उपाययोजना करत असतो. त्यामध्ये सुती कपडे घालणे, तसेच शरीराला थंडावा देतील असे पदार्थ आहारात ठेवतो.
तसेच उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शरीराला थंडावा निर्माण होण्यासाठी फलाहार केला जातो. बाजारपेठेमध्ये आंबा,द्राक्षे, फणस, चिक्कू यासारख्या फळांचा बरोबरच करवंद, काजुफळ, तोरणे, यासारख्या रानमेव्याची विक्री मोठय़ा प्रमाणावर होताना दिसत आहे. असह्य करणार्या उन्हामध्ये अगदी पटकन तोंडात टाकता येणार्या आणि खायला रुचकर असणार्या या रानमेव्यांना लहान मुलांपासून मोठय़ा मंडळीं सर्वाचीच मागणी असते. शरीराला थंडावा देणारा आणि औषधी गुणधर्म असणारा रानमेवा अगदी आवडीने खाताना दिसतात.
Be First to Comment