Press "Enter" to skip to content

वासांबे मोहोपाडा हद्दीत एकूण 62 कोरोना बाधित : 22 जणांची कोरोनावर मात

आज मंगळवारी नव्याने महेश्र्वरी पार्कं मध्ये 2 तर रिसवाडी येथे 2 रुग्ण

# सिटी बेल लाइव्ह / रसायनी-राकेश खराडे #

कोरोना महामारीच्या संकटाने जनजीवन विस्कळित केले आहे. कोरोना संसर्गं कधी, कुठे, कसं, कुणाला, कशाप्रकारे गाठुन वेठीस धरेल हे कुठलाही ज्योतीषी वा तज्ञही सांगु न शकणारी सत्य आणि गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.रसायनी परीसरातील वासांबे मोहोपाडा हद्दीत कोरोनाने आपली दहशत निर्माण केली आहे. यातच कोरोनाचे रुग्ण वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत हद्दीत वाढत असल्याने परीसरात चार दिवस जनता कर्फ्यु लाॅकडाऊनही झाला.दरम्यान मंगलवारी दुपारपर्यंत वासांबे मोहोपाडा हद्दीतील महेश्र्वरी पार्कं वसाहतीत दोघांचे अहवार पाॅजिटीव्ह आले असून रिसवाडीतही दोघा पतीपत्नीचे कोरोना अहवाल पाॅजिटीव्ह आले आहेत.आतापर्यंत वासांबे मोहोपाडा हद्दीतील एकूण 62 जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 22 जण कोरोणामुक्त होवून घरी परतले आहेत.वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत हद्दीत कोरोनासंसर्ग वाढत असल्याने नागरिकांनी खबरदारी घेवून कोरोनाला हद्दपार करावे असे आवाहन होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.