सिटी बेल ∆ रसायनी ∆ राकेश खराडे ∆
संपूर्ण जगाला शांततेचा मार्ग दाखवणारे तथागत गौतम बुद्ध यांची जयंती सम्यक सामाजिक संस्थेच्या रीस येथील कार्यालयात काल साजरी करण्यात आली.
इ. स. 563 पूर्वी नेपाळ येथील लुम्बिनी मध्ये महामायेच्या पोटी जन्मलेल्या आणि राजा शुद्धोधनचे सुपुत्र सिद्धार्थने आपल्या तापश्चर्या आणि ध्यान साधनेच्या आधारावर सिद्ध करून दाखवले होते की, क्रोधावर प्रेमाने आणि शांततेने विजय मिळवता येते. यासाठी संपूर्ण जगाला शांततेच्या मार्गावर चालण्याचा उपदेश त्यांनी दिला.

सम्यक सामाजिक संस्थेच्या कार्यालयात जयंती साजरी करत असताना गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीना पुष्पहार अर्पण करत त्रिसरण ,पंचशील आणि बुद्धवंदना घेऊन पुजापाठ करण्यात आला. गौतम बुद्ध यांच्या जीवनचरित्रावर उजाळा टाकत महादेव कांबळे, प्रकाश गायकवाड, अजित कडलक आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
तसेच यावेळी आंबेडकरी चळवळीत अग्रेसर असणारी ऑल इंडिया पँथर च्या पनवेल तालुका अध्यक्षपदी दयानंद सरवदे यांची नुकतीच निवड झाल्याने त्यांना देखील पुष्पगुच्छ देऊन सम्यक संस्थेतर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले. सम्यक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रकाश गायकवाड, उपाध्यक्ष मामा कांबळे, तायडे सर, अजित कडलक, दयानंद सरवदे, संदिप वानखेडे, दत्ता कांबळे, मोहन कांबळे, महादेव कांबळे, गणेश जावळे आदी सर्व पदाधिकारी, सभासद उपस्थित होते. तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित कडलक यांनी केले.








Be First to Comment