Press "Enter" to skip to content

शरद पवार यांच्या बाबत आक्षेपार्ह पोस्ट

खासदार शरद पवारांविरोधात सोशल मीडिया मध्ये बदनामीकारक पोस्ट करणाऱ्या तरुणाविरुद्ध पनवेलमध्ये गुन्हा दाखल

सिटी बेल ∆ पनवेल ∆ वार्ताहर ∆

राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात सोशल मीडिया मध्ये बदनामी कारक पोस्ट करणाऱ्या तरुणाविरुद्ध पनवेल शहर पोलीस ठाण्यात राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी तर्फे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

शहरातील किरण इनामदार या तरुणाने सोशल मीडियावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात बदनामी कारक पोस्ट केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष व नगरसेवक सतीश पाटील यांना मिळताच त्याच्या मार्गदर्शनाखाली प्रमोद भगत , तुषार पाटील , शहाबाज पटेल ,श्रीधर केदारी बागल , रंजित नरुटे , किशोर साळुंके , राजू नलावडे , नितीन त्रिमुखे , हर्षल बडे , इम्रान सुभेदार आदी पदाधिकारांनी पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कादबाने यांची भेट घेऊन सदर घटनेचा निषेध करीत या तरुणावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करावी अशी मागणी केली .

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे आमचे दैवत असून त्यांची केलेली बदनामी आम्ही कदापी सहन करणार नाही, सदर तरुणाला अटक करून त्याच्यावर कडक कारवाई करावी ‌ ‌ – राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष व नगरसेवक सतीश पाटील

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.