Press "Enter" to skip to content

डोळवली येथे आदिवासी सप्तसुत्री व कातकरी उत्थान अभियान

सिटी बेल • काशिनाथ जाधव •
पाताळगंगा •

रायगड जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली संपूर्ण रायगड जिल्ह्यात आदिवासी सप्तसुत्री व कातकरी उत्थान अभियान राबविण्यात आले असून या अभियानातून आदिवासी बांधवांमध्ये विविध प्रकारची जनजागृती केली असताना खालापूर तालुक्यातील डोळवली आदिवासी वाडीत या कार्यक्रमाचे आयोजन तहसीलदार आयुब तांबोळी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने आदिवासी बांधवांनी हजेरी लावली होती. तर यावेळी आदिवासी समाजातील नागरिकांना जातीचे दाखले, आद्ययावत रेशनकार्ड, संगोयो योजनेचा लाभ, आरोग्य तपासणी शिबीर, शासनाच्या विविध विभागाच्या योजनांची माहिती देण्यात आल्याने आदिवासी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.

तहसीलदार आयुब तांबोळी, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिलकुमार शहा, सरपंच चंदन भारती, उपसरपंच विकास रसाळ, सदस्य अँड.निलम चोरगे, सारीका पवार, माजी जि.प.सदस्य बाळू वाघमारे, शिवसेना उपतालुकाप्रमुख संजय देशमुख, प्रवक्ते सुरेश देशमुख, शाखाप्रमुख विष्णू ठोंबरे, सामाजिक कार्यकर्ते अशोक पिंगळे, सामाजिक महिला कार्यकर्त्यां रमण शिर्के, मंडळ अधिकारी चंद्रशेखर खोत, तलाठी रणजीत कवडे, तलाठी प्रतिक बापरडेकर, तलाठी दिप्ती चोणकर, तलाठी सुर्वणा कोल्हे, कोतवाल सुरेश ठोंबरे, अरुण हातमोडे, कैलास माने, आरती निधी व आरोग्य कर्मचारी, शेतकी अधिकारी, आदीसह मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते.

रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधवाचे वास्तव असून आदिवासी बांधवांची हवी प्रगती झाली नसून शासन स्तरावरुन आदिवासी बांधवांचा आर्थिक, सामाजिक विकास करण्याकरीता अनेक योजना राबविल्या जातात. परंतु तरीही, आदिवासी बांधव अनेक सोयी – सुविधांपासून वंचित आहेत. रायगड जिल्ह्यातील आदिवासी बांधवांचा सर्वांगीण विकास साधण्याच्या दृष्टीकोनातून जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली एक सप्तसूत्री निश्चित अभियान हाती घेण्यात आला.

डिजिटल युगातही आदिवासी समाज शैक्षणिक – सामाजिक – शेतीविषयक समस्यांपासून दूर आहे. या घटकाचा विकास साधण्यासाठी जिल्हाधिकारी साहेब यांच्या संकल्पनेतून सप्तसूत्री कार्यक्रम सुरू असून या आदिवासी सप्तसुत्री व कातकरी उत्थान अभियानातून आदिवासी बांधवांचा सर्वांगीण विकास साधण्याच्या प्रयत्न सुरु असून सर्वानी दैनंदिन जीवन जगत असताना आरोग्य काळजी घ्यावी. ‌ – तहसीलदार आयुब तांबोळी

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.