शिवसेना करणार “धर्मवीर” चित्रपटाचे सामान्य नागरिकांसाठी मोफत शो चे आयोजन
सिटी बेल • पनवेल • संजय कदम •
“धर्मवीर” या चित्रपटाच्या पनवेल येथील प्रीमियर आणि सामान्य नागरिकाकांसाठी मोफत शो चे आयोजन शिवसेनेतर्फे करण्यात येणार आहे.
यानिमित्ताने “धर्मवीर” या चित्रपटाच्या पनवेल येथील प्रीमियर आणि सामान्य नागरिकाकांसाठी आयोजित केलेल्या मोफत शो च्या उपक्रमाचे निमंत्रण नामदार एकनाथ शिंदे यांना दिले तसेच लेखक दिग्दर्शक प्रवीण तरडे याना ही खास आमंत्रण देण्यात आले.
यावेळी नामदार एकनाथ शिंदे यांनी कार्यक्रमाच्या तयारीची चौकशी करून या उपक्रमाबद्दल अभिनंदन केले. या वेळी जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटील, पनवेल महानगर संघटक अॅड. प्रथमेश सोमण, धर्मवीर प्रतिष्ठान चे तालुका अध्यक्ष शाखाप्रमुख अर्जुन परदेशी, प्रसाद सोनवणे, अभिजित साखरे उपस्थित होते. लवकरच नागरिकांना मोफत तिकिटे उपलब्ध करून देऊ अशी माहिती आयोजक तसेच पनवेल महानगर संघटक अॅड. प्रथमेश सोमण यांनी दिली.








Be First to Comment