कोरोनाच्या महासंकटात बेरोजगार झालेल्यांना सरपंच सौ कमला देशेकर यांनी दिली जगण्याची आशा
सिटी बेल • तळोजा •
आर्थिक दृष्ट्या दुर्बल, गरीब घटकांच्या हाताला काम देत, त्यांच्या पायावर उभे करत चिंध्रण ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ कमला एकनाथ देशेकर यांच्या प्रयत्नातून मोफत शिलाई मशीन वाटप करण्यात आले. त्यांना घरबसल्या रोजगाराची संधी उपलब्ध करून कोरोना महामारीत बेरोजगारीतून असलेल्या नैराश्यातून उभे करण्याचे मोलाचे काम चिंध्रन ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ कमला देशेकर यांनी केले आहे. त्यामुळे चिंध्रन गावातील ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले.
सरपंच सौ देशेकर यांनी अक्षय तृतीयाच्या मुहर्तावर हाताचे काम गेलेल्यांना काम देण्याचे मोलाचे काम केले आहे. कोरोना महामारीत देशातील बहुतांश उद्योगधंदे बंद झाले त्यामुळे पुष्कळ लोकांच्या नोकऱ्या गेल्या व ते बेरोजगार झाले त्यामुळे गावात बेरोजगारीची समस्या निर्माण झाली आहे. बेरोजगारी उपाय म्हणून सरपंच सौ देशेकर यांनी एक धाडसी निर्णय घेत ग्रामपंचायतीच्या १५ टक्के निधीतून गावातील होतकरू पुरुष व महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले.

सौ देशेकर यांनी महिलांचे सबलीकरण, सक्षमीकरण करताना अनेक योजना सुरू केल्या आहेत. गावातील महिलाना बचत गटात सामील करून त्यांच्या हाताला काम देण्यासाठी त्या सतत प्रयत्न करत आहेत. तरुणांना रोजगार मिळावा म्हणुन त्या तळोजा औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यात काम मिळण्यासाठी त्या सतत प्रयत्न करत आहेत. त्यांनी कामाच्या जोरावर येणाऱ्या सरपंचांसाठी आदर्श ठेवला आहे.








Be First to Comment