श्री सदस्य परिवारास बैठकीसाठी सिडकोच्या माध्यमातून आरक्षित भूखंड देण्याची बबनदादा पाटील यांची नगरविकास मंत्र्यांकडे मागणी
सिटी बेल • पनवेल •
शिवसेना रायगड चे नवनिर्वाचित जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटील यांनी आज महाराष्ट्र राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी बबनदादा पाटील यांच्या नियुक्तीबद्दल एकनाथ शिंदे ह्यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.

ह्याचसोबत नावडे येथील श्री सदस्य परिवारास बैठकीसाठी सिडकोच्या माध्यमातून आरक्षित भूखंड मिळावा ह्यासाठी आज बबनदादा पाटील यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे ह्यांच्याकडे निवेदन दिले.
यावेळी पनवेल महानगर संघटक प्रथमेश सोमण, विभागप्रमुख गणेश म्हात्रे, तळोजे शहर संपर्कप्रमुख मुरलीधर म्हात्रे आदी उपस्थित होते.








Be First to Comment