Press "Enter" to skip to content

ग्रामस्थांना करावा लागतो पाणी टंचाईचा सामना

विहिरींनी तळ गाठला तेरा वर्ष कालव्याला पाणी नाही : दुरुस्तीच्या नावाखाली बंद केलेला कालवा अद्याप पाण्याच्या प्रतीक्षेत

पशुप्राणी पाण्याच्या शोधात पाटबंधारे विभाग निद्रवस्थेत

सिटी बेल • गोवे-कोलाड • विश्वास निकम •

रोहा तालुक्यातील कुंडलिका सिंचनाखालील कालवे झाले माळ रान पाणी नसल्याने झाडे झुडपं माती घनकचरा भरल्याने शेतकरी चिंताग्रस्त ईडा पीड़ा टळो बळीचे राज्य येवो हि म्हण आता भात कोठार म्हणून इतिहासात जमा झालेल्या रायगडातुन हद्दपार झाल्याची चिन्ह दिसत आहेत.

शेतीला सोडाच मानवी स्वच्छता गुंरढोराना मागील दहा ते बारा वर्षा पासून कोलाड़ पाठबंधारे अभूत पूर्व पुई पुगांव खांब वगळता नडवली चिल्हे देवकान्हे मालसई धामणसई निडी तर्फे अष्टमी तसेच आंबेवाड़ी किल्ला लांढर निवी भूवनेश्वर आशा गावांना पाणी नाही, अद्याप कालव्याला पाणी नसल्याने नागरिकांना व पशु प्राण्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे तर पाणी मागणीवर त्यात देखील मोठी दिरंगाई पाणी येईल की नाही यावर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे.

देवकान्हे विभागीय शेतकरी वर्गाला मागील डिसेंबर महिन्यात पाणी सोडण्यात येईल असे जाहीर आव्हान पाटबंधारे विभागाने केले होते मात्र मे महिना उजाडला अद्याप पाण्याचा पत्ता नाही त्यामुळे शेती सोडाच पिण्याचा पाण्याचा प्रश्न उभा राहिला आहे त्यामुळे याबत पाणी वापर संस्था देवकान्हे रोहा यांची सिंचनपूर्व हंगामा २०२१/२२ च्या आढावा बैठक ही मागील नोव्हेंबर महिन्यात जलसंपदा खात्याचे अधिकारी आणि रोहा कोलाड देवकान्हे धामणसई या विभागातील पाणी वाटप संस्थांचे पदाधिकारी यांच्या समावेत मौजे देवकान्हे येथे पार पडली मात्र यात मोठा गदारोल निर्माण करुण कालव्याचे अर्धवट काम पूर्ण करा मगच शेतकऱ्यांना पाणी द्या असा आग्रह यावेळी कोलाड़ पाठबंधारे विभागीय कार्यकारी अभियंता यांना सदरच्या शेतकरी ग्रामस्थांनी केला.

या विषयी सविस्तर माहिती अशी की सिंचनपूर्व २०२१/२२ या करिता कोलाड पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांनी खांब देवकान्हे पाणी वापर संस्थांची हंगामा आढावा बैठक कोलाड़ पाठबंधाऱ्याचे विभागाचे कार्यकारी अभियंता अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत व पाणी वाटप संस्थेचे अध्यक्ष बाबुराव बामणे यांच्या अध्यक्षतेखाली मागील नोव्हेंबर महिन्यात देवकान्हे येथे संपन्न झाली यावेळी पाठबंधाऱ्याचे पदाधिकारी, तसेच पाणी वापर संस्थांचे धामणसई देवकान्हे चिल्हे खांब पुगाव पुई सह प्रमुख पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते आणि उपस्थित शेतकरी वर्गाला डिसेंबर महिन्यात पाणी मिळेल असे जाहीर आव्हान दिले होते मात्र आजही नागरिक पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

सदरच्या बैठकीत गेली अनेक वर्षे कालव्याची साफसफाई व दुरुस्ती करून शेतकऱ्यांना मुबलक पाणी देऊ मात्र यावर पाठबंधारे खाते कोणतीही दुरुस्ती अथवा सफाई करत नसल्याने पाणी वापर संस्थेच्या पदाधिकार्यानी व उपस्थितीत याविषयाची नाराजी व्यक्त करत या सिंचनावरील कुंडलिकेचा उजवा तीर व डावा तीर हे दोन्ही कालवे गेली दहा ते बारा वर्ष अर्धवट कामांमुळे कालवे पावसाळ्यात अधिक पाझरत असल्याने येथील शेतकऱ्यांचे झालेली नुकसान भरपाई पाठबंधारे विभागाने द्यावी अशी जोरदार आक्रमक भूमिका घेत संपूर्ण कालव्याच्या बांधकामासाठी केलेला खर्च या खर्चाचा आजपर्यंत बळीराज्याला त्याचा उपभोग मिळाला नाही उन्हाली पिक तर सोडाच परंतु पावसाली पिक देखील या कालव्याच्या पाझरत्या झऱ्यामुळे बळीराजा घेऊ शकला नाही त्यामुळे पाठबंधारे खात्याच्या अड़मुठे पनाच्या धोरणामुले आज रायगडातील रोहा तालुक्यातील नडवळी, चिल्हे, देवकान्हे, मालसई ,धामणसई, निडी अष्ठमी, तसेच आंबेवाड़ी , किल्ला ,धाटाव, वाशी ,लांढर, नीवी, या भागांतील बळीराजा अक्षरश उध्वस्त झाला तसेच केलेले काम देखील निकृष्ट दर्जाचे त्यातच उंदीर घुशी खेकडे यांनी पोखरण काढली आसल्याच्या भावना यावेळी व्यक्त करत पोट कालवे व मोऱ्या व त्यावरील गेट अद्याप बसले गेले नाहीत तर ते बसविण्यास कोणती अडचण निर्माण होत आहे असा सवाल यावेळी केला तद्नंतर त्याची पाहणी करत मोऱ्यावर गेट बसवले गेले परंतु काही साकव हे अर्धवट अवस्थेत आहेत.

मागील पन्नास ते साठ वर्ष सातत्याने कुंडलिकेच्या सिंचनातून उजवा तिर डावा तिर लगत असलेल्या शेतकऱ्यांना पुरेपूर पाणी मिळाले त्यातूनच ते भात पीक घेत सुखी आणि समाधानाने जगत होते मात्र २०११/१२ मध्ये सरकारी धोरण म्हणून हे कालवे शेतकऱ्यांकडून दुरुस्ती साठी घेण्यात आले असून कुंडलीकेच्या सिंचनातून उजवातीर म्हणून १ते ८ पुई पुगांव खांब या मधे सुकेली आंबाखोरे सुकेली नागोठणे सह व्यावसायिक यांना पाणी वापर होतो ९ ते २९ हा नडवळी देवकान्हे मालसई निडी तर्फे अष्टमी आशा शेतकऱ्यांना या सिंचनातून पाणी वापर होतो डावा तीर यामधुन १ते १० कोलाड़ चिंचवली तिसे माणगाव १ते२० रोहा यामधे आंबेवाड़ी किल्ला वाशी निवी भुवनेश्वर असा समावेश आहे १ते ३३तिसे धरणाची वाडी मोर्बा माणगाव शाखा माणगाव १ते५गोरेगाव शाखा माणगाव शाखेत वडपाले टेमपाले यांचा देखील यामध्ये समाविष्ट आहे, रोहा माणगाव या शाखेच्या कालवा दुरुस्ती करता २००८/९या साली जागतिक बँकेनी पाणी वापर संस्था स्थापन करून ४कोटि चे टेंडर या कमाकरता काढले हे टेंडर त्यांनी जलसंपदा विभाग वाइज शाखांच्या कामाकरता काढले पाठबंधारे विभागातून लोकांचा सहभाग घेण्यासाठी पाणी वाटप संस्था स्थापन करण्यात आली जेणेकरून सिंचनाचा कारभार हस्तगत करून पाणी वाटप संस्थेने हा कारभार संभाळावा या अटीवर निधी उपलब्ध करून दिली व टेंडर देखील पास झाले मात्र या निधिचा वापर अर्धवट कामांमुळे झाला नाही तदनंतर पुन्हा मास्टर कंट्रक्शन ने तब्बल १८ कोटीचे टेंडर पुन्हा जागतिक बँकेकडून पास करून घेतले या मधे कुंडलीकेच्या उजवा तीर तसेच १ते ८ मोर्बा शाखा १ते २०रोहा शाखा ९ते२० अष्ठमी शाखा या विभागावाइज मिळालेले टेंडरच्या पैशातून काम सुरु करण्यात आले या टेंडर मधे महत्वाचे बांधकाम लाइनिग आणि भराव या कामा करिता हे टेंडर होते मात्र मास्टर कंस्ट्रक्शन ने सगळे जुने बांधकाम तोडून ठेवले मात्र काम करण्यास ते आपत्र ठरले असून तेही टेंडर बरखास्त झाले नंतर राज्य सरकारच्या मंत्री मंडळातून जलसंपदा खात्यातून २०११/१२ साली कालवा नुतनी करण्यासाठी रोहा शाखेसाठी उजवा तीर डावा तीर यासाठी २८ कोटि तर माणगाव शाखे साठी ६२ कोटी रूपयांची तरतूद व मंजुरी करून राज्य सरकाच्या वतीने टेंडर काढण्यात आले यामध्ये प्रामुख्याने उजवा तीर देवकान्हे मालसई निडी अष्टमी शाखा १४कोटि व रोहा डावा तीर आंबेवाड़ी किल्ला नीवी १४कोटि तर माणगाव करिता ६२ कोटि कोलाड़ चिंचवली तिसे वरसगाव मोर्बा गोरेगाव टेम पाले वड पाले ह्या कामाकरता टेंडरची विभागनी करून २०११साली याची मंजूरी देखील आली आणि २८ कोटीचे टेंडर भापकर यांना दिले तर ६२कोटीचे टेंडर आर के मदानी यांना दिले गेले.

सदरचे काम ठेकेदारानी सुरु देखील केले माणगाव मोर्बा १ते १० व १ते ३२ या अंतराचे पानी १९८२ साली २९ की मि अंतरापर्यन्त जात होते परन्तु कोट्यावधी रूपये खर्च करून हे पानी फक्त १० ते १५ कि. मि अंतर पार करत आहे तर वडपाले टेम पाले या कालव्यात पानीच पोहचत नाही त्या मुले ६२ कोटीची कामे काय झाली असा सवाल यावेळी माणगाव शाखेनी केला तर रोहा शाखेवर २८ कोटित देवकान्हे अष्टमी या कालव्याला केलेले कॉक्रेटीकरण हे पहिलाच पावसात वाहून गेले तर आंबेवाड़ी किल्ला वाशी नीवी या कालव्यावर अपुरा निधी असल्यामुळे टेकेदारने हे काम अर्धवट बंद केले तर रोहा शाखेचे उजवा तीर डावा तीर हे दोन्ही कालव्याचे काम गेली पाच वर्ष अर्धवट अवस्तेत शेतकऱ्यांच्या शेतात होत असलेले लीकेज अथवा पाझर असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याने पानी वापर संस्था यांनी पाणी सोडण्याबात विरोध केला.

कालव्याला पाणी सोडा अन्यता आंदोलन करू :- रायगड भाजप युवा मोर्चा अध्यक्ष अमित घाग

कोलाड़ पाठबंधारे विभागाने कलवा मोऱ्यांवर व लाइनिगवर कोरोडो रूपये खर्च केले तर काही ठेकेदार अर्धवट काम करून पळून गेले तर काही निकृष्ट दर्जाची कामे झाली आहेत त्यातच पाठबंधारे विभागाने व्यापार धोरण स्वीकारले त्यांना शेतकरी बळीराजाशी काही घेणे देने नाही दर साल करोड़ो रूपयांचा कंपन्यांकड़ूं पनिपट्टी मलीदा लाटला जातो त्याचा फायदा या विभागला व् सरकारला देखील होतो शेकऱ्यांसाठी श्वासत पाणी पुरवठा होवा म्हणून साऱ्या योजना आल्या मात्र कोणतीही योजनेचा लाभ आजपर्यंत शेतकरी बळीराजाला मिळाला नाही गोवे कोलाड़ धरनाचा प्रश्न ऐरणीवर त्यात पुई पुगांव खांब वगळता तालुक्यातील इतर शेतकरी वर्गासाठी म्हणजे सरासरी ७०० ते ८०० हेक्टर भातशेती अष्टमी शाखा व् किल्ला निवी शाखा येथील शेती या अभावी उध्वस्त झाली कालव्याला पाणी येत नसल्याने विहीरी तलाव आटले जातात गेली सात ते आठ वर्षात या विभागाकडून कालव्याचा गाल देखील काढला गेला नाही मोर्यांची कामे अर्धवट येत्या काळात काम पूर्ण करून देतो ही शाश्वती गेली सात वर्ष शेतकऱ्यांसाथी फॉल ठरली त्यामुळे येथील ग्रामस्थाना पानी टंचाई चा प्रश्न मोठा निर्माण होत आहे तसेच उन्हाली भात शेती नसल्याने समान्यांची रोजी रोटी हरपली, व या कामाबबतचा तसेच शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांचा विचार शासनाने करवा त्याच बरोबर जर देवकान्हे येथील बैठकीत दस्तुरखुद्द उपभियंता यांनी २०२१ च्या डिसेंबर महिन्यात कालव्याला पाणी सोडणार कोणत्याही प्रकारची सबब ऐकली जाणार नाही मात्र डिसेंबर २०२१ ला पाणी सोडणारे पाटबंधारे विभाग २०२२ चा मे महिना उजाडला अद्याप पाण्याचा पत्ता नाही तर आंबेवाडी लांढर निवी भुवनेश्वर या कालव्याची कोणतीच दुरुस्ती व साफसफाई केली नाही याकरता रोहा तालुका भाजपच्या वतीने निवेदन देखील देण्यात आले असून जर का येत्या तीन आठवड्याभरात कालव्याला पाणी सोडले नाहीत तर रोहा भाजप आंदोलनाच्या पवित्र्यात असेल.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.