नगरसेवक विकास घरत यांच्या पाठपुराव्याला यश
सिटी बेल • पनवेल • संजय कदम •
पनवेल महानगरपालिकेचे कामोठे वसाहतीमधील कार्यसम्राट नगरसेवक विकास नारायण घरत यांनी सिडकोकडे केलेल्या वेळोवेळी पाठपुराव्याला यश येऊन ०१ मे महाराष्ट्र दिनी प्रत्यक्ष पदपथाची कामे व भूमिपूजन सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या शुभ हस्ते करण्यात आली.
कार्यसम्राट नगरसेवक विकास नारायण घरत यांनी सिडको शी वेळोवेळी पाठपुरावा करून शिवकल्पतरु आर्केड, प्लॉट-१, सेक्टर-१७ आणि तसेच सेक्टर ३६ प्लॉट न- २० तसेच अनेक सोसाट्याचे पदपथाची कामे सुरू व भूमिपूजन सोहळा सभागृह नेते परेशशेठ ठाकूर यांच्या हस्ते पार पडला.

यावेळी कामोठे भाजप शहराध्यक्ष रवी जोशी, नगरसेवक विजय चिपलेकर, दिलीप पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते प्रदीप भगत यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. नगरसेवक विकास घरत यांनी सातत्याने पाठपुरावा करून प्रत्यक्ष कामाला शुभारंभ केल्याने स्थानिक रहिवाश्यांनी त्यांचे आभार मानले आहेत.








Be First to Comment