सिटी बेल • रसायनी • राकेश खराडे •
मोहोपाडा रसायनी रहिवासी वसाहतीमधील विविध समस्यां बाबत मनसे रसायनी शाखेच्या वतीने उपअभियंता सुधीर शिंदे यांना मनसे जिल्हा उपाध्यक्ष दीपक कांबळी यांच्यावतीने निवेदन देण्यात आले.
मुख्यतः रसायनी परिसरातील सर्वंत्र रस्ते खराब झालेले आहेत.तर विद्येचे माहेरघर असणा-या शाळांत शिक्षणासाठी जाणा-या विद्यार्थ्यांना तसेच नागरीकांना यांचा त्रास सहन करावा लागत आहे.हे रस्ते त्वरित करण्यात यावेत अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे.शिवाय परिसरात जे पथदिवे बंद आहेत.ते सुरू करण्यात यावेत.
पावसाळाजवळ आला आहे, त्या अनुषंगाने गटारांची साफसफाई करणे.
संपूर्ण वसाहतीमध्ये कर्मंचा-यांची समस्या फार गंभीर आहे.त्यावर त्वरित उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.शिवाय
पाताळगंगा नदीवरील जुन्या पूलाचे काम करुन लवकरात लवकर सुरू करण्यात यावे.अशीही मागणी
मनसेच्या वतीने करण्यात आली.
यावेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष दिपक कांबळी,विभाग अध्यक्ष भास्कर डुकरे, मनोज जाधव आदी उपस्थित होते.








Be First to Comment