Press "Enter" to skip to content

भाविकांच्या आरोग्याशी खेळ

पेण वाशीच्या यात्रेत भाविकांना गढुळ पाणीपुरवठा ; ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे नियोजन शुन्य

पाणीच येत नसेल तर मग शासनाच्या जलशकत्ती अभियानांतर्गत शपथ घेणे कितपत योग्य — सरपंच गोरख पाटील

सिटी बेल • पेण • वार्ताहर •

पेण तालुक्यातील खारेपाट भागामध्ये सध्या यात्रांचा हंगाम जोरात सुरू झाला असून दोन दिवसांपूर्वी वाशीच्या जगदंबा मातेची यात्रा भरली होती. या यात्रेकरीता महाराष्ट्रातून अनेक भाविक आले. मात्र या भाविकांना दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गढुळ पाणी प्यावे लागल्याने नागरीकांमध्ये संतापाची लाट पसरली त्यामुळे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचा नियोजन शुन्य असल्याचे दिसून आले आहे.

मागील अनेक वर्षांपासून खारेपाट विभाग पाण्याने व्याकुळ असून आशा यात्रा दरम्यान सुध्दा व्यवस्थीत पाणीपुरवठा होत नसेल तर मग शासनाच्या जलशकत्ती अभियानांतर्गत ग्रामपंचायतीच्या मार्फत शपथ घेतली जाते ती कशासाठी घ्यायची जर पाणीच आम्हाला मिळत नसेल तर या शपथीचा काय उपयोग असे वक्तव्य वाशी सरपंच गोरख पाटील यांनी केले आहे.

तालुक्यातील वाशी, वढाव, भाल, काळेश्री, विठ्ठल वाडी, बोर्झे लाखोले, बहिराम कोटक, तामसीबंदर, तुकाराम वाडी, कान्होंबा या खारेपाटातील गावांसह अनेक वाड्या पाणी टंचाईला सामोरे जात आहेत.दरवर्षी टंचाईग्रस्त भागातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी पेण पंचायत समितीच्या माध्यमातून आराखडा आखला जातो.आणि त्यानुसार पाणीपुरवठा केला जातो.परंतु रोजच्या असणा-या पाणीपुरवठा टंचाईला येथील नागरीक सामोरे जात आहेत.पण किमान सणासुदीच्या दिवसांत तरी या खारेपाटातील गावांकरीता पाणीपुरवठा योग्य करण्यात यावी अशी अपेक्षा नागरीकांची असते.महाराष्ट्रात गावोगावी सध्या यात्रांचा हंगाम जोरात सुरू आहे.

मागच्या दोन वर्षे कोरोनाचे संकट असल्याने कोणालाही सण, उत्सव साजरे करता आले नाही त्यामुळे यावर्षी होत असलेल्या यात्रांना भाविकांची अलोट गर्दी पाहवयास मिळणार असल्याने त्याच अनुषंगाने पेण तालुक्यातील वाशीच्या श्री. भवानी जगदंबा मातेची यात्रा ही प्रसिद्ध यात्रा असून येथे हजारों संख्येने भाविक तसेच मोठ मोठे व्यापारी, दुकानदार येत असतात त्यामुळे सदर नागरिकांसह येणाऱ्या भाविकांना किमान दोन दिवस तरी मुबलक व स्वच्छ पाणीपुरवठा करण्यात यावा याकरिता वाशी ग्रामपंचायतीने दि.७ एप्रिल २०२२ रोजी पेण ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला पत्र देऊन १४ ते १६ या दरम्यान योग्य तो पाणीपुरवठा करावा त्या माध्यमातून संबंधित अधिकारी राठोड यांनी वाशी सरपंच यांना शब्द देऊन अश्वसित केले.

मात्र यात्रेच्या एक दिवस अगोदर सुद्धा पाणी आले नसून दुसऱ्या दिवशी पाणी आले मात्र ते अतिशय गढुळ, अशुद्ध व दुर्गंधीयुक्त असा पाणी यात्रेच्या दिवशी आल्याने यावेळी पाणीपुरवठा विभागाचा भाविकांनी जाहीर निषेध केला. त्यामुळे या गढुळ पाण्याने नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.अखेर यात्रेकरीता आलेल्या भाविकांसाठी नागरीकांनी पेण शहरातून पाणी विकत आणून त्यांची तहान भागवावी लागली यामुळे येथील नागरीकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.गेली अनेक वर्ष पाणीटंचाईने ग्रासलेला पेण खारेपाट विभाग केंव्हा सुजलाम सुफलाम होणार याचीच उत्कंठा येथील नागरीकांना लागून राहिली आहे.

मागच्या दोन वर्ष कोरोनाचे संकट असल्याने वाशीच्या देवीची यात्रा होऊ शकली नाही. मात्र यावर्षी सदर यात्रा मोठ्या प्रमाणात होणार असल्याने या भागाला दोन दिवस योग्य तो पाणीपुरवठा करावा याकरिता ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला पत्रव्यवहार करण्यात आला त्यानुसार संबंधित अधिकारी राठोड यांनी त्या दिवशी पाण्याचे नियोजन करण्यात येईल असे आश्वासित केले होते.परंतु काही राजकीय दृष्ट्या हेतुपुरस्कर यात्रेच्या दिवशी पाणीपुरवठा केला नाही. दुसऱ्या दिवशी झालेला पाणीपुरवठा स्वच्छ आणि दुर्गंधीयुक्त असल्याने अधिकारी वर्गाने आमच्या नागरिकांची दिशाभूल केली आहे.जर शासनाकडून जलशकत्ती अभियानांतर्गत ग्रामपंचायतीमध्ये शप्पथ घेण्याचे आहे.मात्र या दिवशी तरी योग्य पाणीपुरवठा होत नसेल तर अशी शपथ घेणे कितपत योग्य आहे.
– गोरख पाटील, सरपंच वाशी ग्रामपंचायत

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.