Press "Enter" to skip to content

नवीन पनवेल येथे भीम जयंती महोत्सव

नगरसेवक प्रकाश बिनेदार यांच्याकडून तीनदिवसीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन

सिटी बेल • नवीन पनवेल •

भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक तथा उत्तर रायगड जिल्हा भाजपा अनुसूचित जाति मोर्चा अध्यक्ष प्रकाश बिनेदार यांनी येत्या १४,१५ व १६ एप्रिल रोजी भव्य प्रमाणात भीम जयंती महोत्सवाचे आयोजन नवीन पनवेल येथे केले आहे.

भारतीय जनता पक्ष अनुसूचित जाती मोर्चा नवीन पनवेल व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमातुन १४,१५ व १६ एप्रिल रोजी सिडको क्रीडांगण, सेक्टर २, जय अंबे माते मंदिराच्या शेजारी, शिवा कॉम्प्लेक्स च्या बाजूला, नवीन पनवेल येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३१ वा व छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३९२ वा तसेच क्रांतिसूर्य ज्योतीराव फुले यांचा १९५ वा संयुक्त जयंती महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे.

या महोत्सवास प्रमुख पाहुणे म्हणून लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महानगर पालिकेच्या महापौर डॉक्टर कविता चौतमोल, महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख, भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाति मोर्चा महाराष्ट्राचे अध्यक्ष सुधाकर भालेराव, माजी कोकण म्हाडा अध्यक्ष बाळासाहेब पाटील, पनवेल महानगर पालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, पाटील भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा नगरसेवक विक्रांत पाटील, उपमहापौर सिताताई पाटील, भाजपा तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष जयंत पगडे, माजी नगरसेवक वाय टी देशमुख आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या जयंती महोत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणजे १४ एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता रिक्षावाला फेम गायिका रेश्मा सोनवणे आणि गायक गीतकार एकनाथ माळी यांचा सामना तसेच 15 एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक शिंदेशाही फेम आनंद शिंदे आणि पार्टी यांचा गायनाचा कार्यक्रम असणार आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.