जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली कळंबोलीतील शेकडो नागरीकांचा शिवसेनेत प्रवेश
सिटी बेल • खारघर •
शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली कळंबोली गावातील माया भगत, कृष्णा भगत, राजेश परशे, समीर परशे, कुणाल भगत, सरिता भगत, जागृती भगत, दीक्षा भगत, यांच्यासह विविध पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
यावेळी जिल्हाप्रमुख शिरीष घरत साहेब यांनी सर्व कार्यकर्त्यांच्या हाती शिवबंधन बांधून शिवसेना पक्षात स्वागत केले.

याप्रसंगी तालुका संघटक भरत पाटील, तालुका संपर्कप्रमुख योगेश तांडेल, विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर, महानगर समन्वयक गुरुनाथ पाटील, उपमहानगर प्रमुख दिपक घरत, कळंबोली शहर प्रमुख डी. एन. मिश्रा, खारघर शहर प्रमुख प्रकाश गायकवाड, शहर समन्वयक कळंबोली गिरीश धुमाळ, शहर संघटक कळंबोली अरविंद कडव, उपशहर प्रमुख नवीन पनवेल ज्ञानेश्वर भंडारी, विभाग प्रमुख कळंबोली आकाश शेलार, शाखा प्रमुख रामा देवरमनी, शाखाप्रमुख चिंतामणी शेळके, डीबीएस महिला दक्षता पथक रायगड जिल्हाध्यक्ष्या सौ. अलका दिपक घरत आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.













Be First to Comment