आदई येथे साकव बांधण्याच्या कामाला सुरुवात : शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या हस्ते भूमिपूजन
सिटी बेल • पनवेल •
आज दिनांक १० एप्रिल २०२२ रोजी जिल्हा नियोजन निधीतून शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड शिरीष घरत यांच्या प्रयत्नांमुळे पनवेल ग्रामीण भागातील आदई गाव येथे साकव बांधणे (रू. ५ लक्ष) या कामाचा आज रामनवमीच्या शुभ मुहुर्तावर जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून कामाचा शुभारंभ करण्यात आला.

याप्रसंगी तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल, तालुका प्रमुख ज्ञानेश्वर बडे,उपमहानगर प्रमुख दिपक घरत, नवीन पनवेल शहर प्रमुख यतीन देशमुख, कामोठे शहर प्रमुख राकेश गोवारी, शहर संघटक जगदीश शेलके, उपशहर प्रमुख ज्ञानेश्वर भंडारी, विभाग प्रमुख संतोष गोळे, नविन पनवेल विभाग प्रमुख बिपीन झुरे, उपविभाग प्रमुख राजेश वैंगणकर, सतीश गायकर, अविनाश गव्हाणकर, आदई गाव सरपंच रमाकांत गरूडे, माजी उपसरपंच विलास शेळके, माजी सरपंच प्रभाकर शेळके, सदस्य श्रीचंद भंडारी, पोलीस पाटील कैलास गरुडे, संदेश पाटील, भरत भंडारी, सत्यवान काकडे, बाळाराम पाटील, विष्णू शेळके, शंकर पाटील,अनिल शेलके, रविंद्र शेलके आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








Be First to Comment