भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर जयंती सर्वानी उत्साहात साजरी करावी – वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने
सिटी बेल • पनवेल • संजय कदम •
भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर जयंती सर्वानी उत्साहात करावी परंतु शासनाकडून निर्गमित करण्यात आलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांनी आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना केले .

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या अनुषंगाने पनवेल शहर पोलीस ठाण्यात बैठक घेण्यात आली. सदर बैठकीत होणारे कार्यक्रम व निघणाऱ्या मिरवणूकींबाबत उपस्थितांना शासनाकडून निर्गमित करण्यात आलेल्या सूचनां प्रमाणे मार्गदर्शन वपोनि विजय कादबाने यांनी केले.
सदर बैठकीत स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंके यांनी सानिगितले की कोरोना काळामुळे मागील दोन वर्ष भीम सैनिकांना जयंती साजरी करता आली नाही परंतु आता शासनाने सर्व निर्बंध दूर केल्या मुले भीम सैनिकांन मध्ये उत्साहाचे वातावरण आहे त्यामुळे सर्व मंडळांना आंबेडकर जयंती साजरी करण्याकरीता परवानगी देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली.
या बैठकीला पनवेल शहरातील पंचशील नगर , नवनाथनगर, करंजाडे, वडघर , ओवळे सह अनेक ठिकाणचे पदाधिकारी , पोलीस पाटील कुणाल लोंढे , राज सदावर्ते याच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते .








Be First to Comment