11 एप्रिल रोजी जलसंपदा मंत्री जयवंतराव पाटील उरण मध्ये येणार
सिटी बेल • उरण • विठ्ठल ममताबादे •
राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार संवाद दौऱ्यानिमित्त 11 एप्रिल रोजी राज्याचे जलसंपदामंत्री राष्ट्रवादीचे नेते जयंतराव पाटील हे उरणमध्ये येत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार संवाद दौऱ्याची माहिती देण्याकरता आज महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस तथा निरीक्षक नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रशांत पाटील व महिला प्रदेश सरचिटणीस तथा निरीक्षक पनवेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भावनाताई घाणेकर,उरण विधानसभा अध्यक्ष वैजनाथ ठाकूर, जिल्हा उपाध्यक्ष भार्गव पाटील,तालुकाध्यक्ष मनोज भगत, शहर अध्यक्ष गणेश नलावडे, तालुका महिला अध्यक्ष हेमांगी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार परिषद संपन्न झाली.

या राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रमा अंतर्गत खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री आदितीताई तटकरे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूबभाई शेख, आमदार अनिकेत तटकरे, रायगड जिल्हाध्यक्ष सुरेशभाऊ लाड, महिला जिल्हाध्यक्ष उमाताई मुंढे, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, युवक जिल्हाध्यक्ष अंकित साखरे, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे आदी पदाधिकारीहि या दौऱ्या निमित्त उरण मध्ये येणार आहेत.
कार्यकर्ते पदाधिकारी यांच्याशी संपर्क करून जनतेच्या, नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करण्या हेतूने या राष्ट्रवादी परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रशांत पाटील यांनी यावेळी दिली.पत्रकारांनी यावेळी उरण मधील विविध समस्या संदर्भात व राष्ट्रवादी परिसंवाद कार्यक्रम संबंधी प्रश्न विचारले असता प्रत्येक प्रश्नाचे उत्तर त्यांनी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली. प्रत्येक प्रश्न अथवा समस्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका काय आहे हे सविस्तरपणे सांगितले.
यावेळी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर झालेल्या दगडफेक हल्ल्याचा निषेध करण्यात आला. सदर हल्ला हा भ्याड असून वकील सदावर्ते यांच्यावर कडक कारवाई करावी तसेच या हल्ल्या पाठीमागे,या षडयंत्रा मागे असलेल्या दोषींना अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी प्रशांत पाटील यांनी केली. या हल्ल्याचा निषेध म्हणून उरण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे उरण मधील गांधी पुतळ्या जवळ हाताला काळ्या फीत बांधून मूकमोर्चाही काढण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्या नंतर शेवटी वैजनाथ ठाकूर यांनी सर्व उपस्थितांचे, पत्रकार बांधवांचे आभार मानले.








Be First to Comment