महागाई विरोधात महाआघाडीचा 13 एप्रिल ला निघणाऱ्या मोर्चाची जोरदार तयारी
सिटी बेल • रसायनी •
केंद्र सरकारच्या महागाई विरोधात 13 एप्रिल 2022 रोजी आयोजित मोर्च्याच्या पूर्व तयारीसाठी दुसऱ्या दिवशीची पहिली बैठक गुलसुंदे जिल्हा परिषद मतदारसंघातील सोमाटणे येथील शिवगंगा वॉटर पार्क अँड रिसॉर्ट येथे पार पडली.

या सभेत कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार बाळाराम पाटील, उरणचे माजी आमदार मनोहरशेठ भोईर, महाविकास आघाडीचे अध्यक्ष शिवसेना रायगड जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जी. आर. पाटील, पंचायत समिती सदस्य वसंत काठावले, जगदीश पवार, जिल्हा परिषद सदस्य राजू पाटील, सुदाम पाटील, नारायणशेठ घरत, समाजवादीचे जिल्हा अध्यक्ष अनिल नाईक, राजेश केणी, प्रवीण कांबळे, काँग्रेस पनवेल तालुका अध्यक्ष नंदराज मुंगाजी आदी अनेक नेतेमंडळी उपस्थित होते.









Be First to Comment