Press "Enter" to skip to content

५० लाखांचा निधी मंजूर

पाण्यासाठी नागरीकांना दिलेला शब्द पुर्ण करता आले हेच समाधान — वैकुंठ पाटील

सिटी बेल • पेण • वार्ताहर •

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आणि केंद्र शासनाच्या जल जीवन मिशन योजनेच्या माध्यमातून पेण तालुक्याच्या रावे गावातील रावे -खोकरी, कासु, मोरा कोठा या भागाला ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात येऊन या योजनेच्या माध्यमातून मागच्या अनेक वर्षांपासून पाण्यासाठी अलिप्त राहिलेल्या नागरीकांना मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा होणार असल्याने आपल्याला ख-या अर्थाने समाधान झाले आहे असे प्रतिपादन रायगड जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते वैकुंठ पाटील यांनी पाईप लाईनच्या उद्घाटन प्रसंगी केले.

रायगड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, पेणचे आमदार रविशेठ पाटील, आमदार निरंजन डावखरे यांच्या पाठपुराव्याने आणि भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांच्या प्रयत्नाने रावे या भागाला तब्बल ५० वर्षानंतर पिण्याचे पाणी पोहोचत असल्याने याचा शुभारंभ वैकुंठ पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आला.

यावेळी सरपंच संध्या पाटील, उपसरपंच रोशन पाटील, सदस्य शुभांगी पाटील, सरिता पाटील, मनस्वी पाटील, नवनाथ पाटील, कळवे माजी सरपंच सुर्यहास पाटील, नाशिकेत पाटील, जेष्ठ कार्यकर्ते धनाजी पाटील आदिंसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना पाटील म्हणाले की, नागरीकांच्या घरापर्यंत पाणी पोहोचविणे यासारखे पुण्याचे काम दुसरे कोणतेच नाही या कामाचा गेली दोन ते अडीच वर्षे पाठपुरावा करत होतो.अनेकांनी यात खोडा घालण्याचा प्रयत्न केला मात्र ते असफल ठरले असून शासकीय सर्व स्थतरावर मंजूरी मिळविताना तत्कालीन पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी देखील तातडीने आदेश देऊन आम्हाला उपकृत केले. यासह आमदार रविशेठ पाटील यांनीही सदर योजना पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहिले. त्यामुळे येत्या एक ते दीड महिन्यात या भागातील लोकांच्या घरापर्यंत पाणी पोहोचणार असल्याचे शेवटी सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.