हंडाभर पाण्यासाठी डोंगराच्या पायथ्याजवळून एक किलोमीटर करावी लागत होती पायपीट
सिटी बेल • रसायनी • राकेश खराडे •
गेली अनेक वर्ष पाण्यापासून वंचित असलेल्या खालापूर तालुक्यातील करंबेळी ठाकुरवाडी येथे अखेर पाण्याची व्यवस्था झाली असून कूपनलिकेच्या माध्यमातून जलकुंभात पाणी साठवून या जलकुंभातून ठाकूरवाडीतील सर्व कुटुंबांना या पाण्याचा लाभ मिळणार आहे. मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या करंबेळी ठाकुरवाडीत स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही रस्ता नाही तर हंडाभर पाण्यासाठी डोंगराच्या पायथ्याजवळून एक किलोमीटर पायपीट करावी लागत होती.

यावेळी आदिवासी बांधवांनी ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करून बोअरवेलच्या माध्यमातून स्वतःची पाण्याची व्यवस्था करून घेत लोक सहभागातून उंचावर जलकुंभात हे पाणी साठवून वाडीत पाणी पोहोचेल असे नियोजन केले आहे.ह्या जलस्त्रोताचे लोकार्पण सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी सतीश शेवाळे आणि खरीवली येथील तरुण कार्यकर्ते प्रशांत पाटील, ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते राजेश रसाळ, विपिन माटे सतीश मोकल, संतोष घाटे, अंकुश माडे,यशवंत मांडे यांच्यासह आदिवासी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.








Be First to Comment