Press "Enter" to skip to content

अध्यक्षपदी मंगेश धामणसे यांची निवड

खालापूर तालुका शेतकरी प्रतिष्ठान संघटनेची स्थापना

सिटी बेल • काशिनाथ जाधव •
पाताळगंगा •

खालापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची सर्वसाधारण देवन्हावे ग्रामपंचायत सभागृह येथे कानोजी जाधव यांच्या अध्यक्षतेखाली खाली पार पडली. यावेळी खंडू पाटील व दत्तात्रेय मुसळे यांच्या मार्गदर्शनाखाली खालापूर तालुका शेतकरी प्रतिष्ठान या नावे शेतकरी संघटना स्थापन करण्यासाठी एकमताने ठराव घेण्यात आला.

या सभेत अध्यक्षपदी खानावचे मंगेश धामणसे तर संपूर्ण कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली. नव्या कार्यकारिणीवर अभिनंदन करित पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा देण्यात आल्या. या सभेत तालुक्यातील विविध भागातून 55 शेतकऱ्यांनी उपस्थिती नोंदवली होती.

खालापूर तालुका शेतकरी प्रतिष्ठान संघटनेच्या कार्यकारणी अध्यक्षपदी मंगेश खंडू धामणसे (खानाव), उपाध्यक्षपदी राजेश मोरे (रानसई), सचिवपदी अनिल पाटील (उंबरे), सहसचिवपदी विजय वाघमारे (आडोशी), खजिनदारपदी राजेश दिवडे (खानाव), सदस्यपदी कृष्णा पाटील (तुकसई), रामदास बडेकर (तळवली), काशिनाथ पिंगळे (घोडीवली), लिला खोपडे (उंबरे), आर्पिता पाटील (परखंदे), दत्तू कातकरी (गणेशनगर आदिवासीवाडी), निलेश दळवी (होराळे), महेश पाटील (आपटी), अंकुश माडे (करंबेली ठाकूरवाडी) आदी बिनविरोध निवड करण्यात आली.

तर मार्गदर्शक खंडू पाटील यांनी राज्य शासन आणि पंचायत समिती कृषी विभागाच्या विविध योजना, शेतकरी संघटनेची गरज, शेतकरी संघटनेचे उद्देश, शेतकरी संघटनेचे सभासद पात्रता, शेतकरी संघटनेची कार्यकारिणी आणि सभासद वर्गणी यासंदर्भात मार्गदर्शन केले असून दत्तात्रय मुसळे यांनी शेतकऱ्यांना शेतीपूरक प्रकिया व्यवसाय, कुक्कुटपालन यासंदर्भात माहिती दिली. तसेच आर्पिता अमित पाटील यांनी उपस्थितांना शेती क्षेत्रातील महिलांचा सहभाग वाढविण्याची गरज आणि त्यासाठी करावयाचे प्रयत्न या संदर्भात विश्लेषण केले.

तसेच अध्यक्षीय भाषणातून कानोजी जाधव यांनी आपले मत व्यक्त करताना म्हणाले की, शेतीकडे पाहण्याचा व्यवसायिक दृष्टिकोन वाढविणे, तरुण पिढीतील व्यसनाधीनता कमी करणे, संघटनेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविणे असे मत व्यक्त जाधव यांनी मांडले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.