सुकापुरकरांना मे महिन्यापासून सुकापुर मध्ये धान्य मिळणार
सिटी बेल • सुकापूर •
नुकतेच शेकाप चे पनवेल तालुका चिटणीस आणि माजी उपसभापती राजेश केणी यांनी पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांची भेट घेतली .
खरंतर सुकापुर हे लोकसंख्येच्या बाबतीत तालुक्यामधील जवळजवळ सर्वात मोठ्या गावांपैकी एक असून देखील रेशन दुकान(रास्त भाव धान्य पुरवठा केंद्र) हे गेल्या वर्षभरापासून चीपळे ठिकाणी कार्यरत होतं. नागरिकांकडून विविध मागण्या होत होत्या. यात प्रामुख्याने सुकापूर येथे रेशन दुकान सुरू होणे ही सगळ्यात महत्त्वाची मागणी होती.
माननीय तहसीलदार यांची राजेश केणी यांनी भेट घेऊन सुकापुर मधील दुकान लवकरात लवकर सुरू व्हावं अशा पद्धतीची विनंती केली. खरंतर यापूर्वी सुकापूर मध्ये दुकान कार्यरत होतं मात्र त्या दुकानदारांनी त्यांचा राजीनामा दिल्यानंतर शासकीय प्रक्रियेनुसार काही काळ उशीर निश्चितपणे गेला. त्याचा त्रास मात्र नागरिकांना मोठ्या प्रमाणात भोगावा लागला हे जळजळीत वास्तव आहे.
तहसीलदारांशी बोलताना राजेश केणी यांना कळलं की दुकानाबाबत शासकीय प्रक्रिया सुरू आहे.
किंबहुना निविदा स्तरावरती काम येऊन ठेपले आहे. साधारण एप्रिल महिन्यामध्ये ती प्रक्रिया पूर्ण होऊन मे महिन्यापासून सुकापूरकरांसाठी रास्त भाव धान्य हे सुकापुर गावांमध्येच मिळेल अशी तरतूद होईल.








Be First to Comment