Press "Enter" to skip to content

अनुभव रंगमंचाचा, रंगकर्मींचा कार्यक्रमाचे आयोजन

“जागतिक रंगभूमी दिन” पनवेल मध्ये साजरा

सिटी बेल • पनवेल • 

जागतिक रंगभूमी दिनाच्या निमित्ताने जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या सहकार्याने पनवेलमधील रिफ्लेक्शन थिएटर या तरूणांसाठी नाट्य क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेच्या माध्यमातून “अनुभव रंगमंचाचा, रंगकर्मींचा”  या कार्यक्रमाचे आयोजन आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे करण्यात आले होते.

याप्रसंगी सर्व उपस्थित कलाकार आणि कलारसिकांना शुभेच्छा आणि मार्गदर्शन करण्यासाठी विरोधी पक्षनेते श्री.प्रितम जनार्दन म्हात्रे,श्री.अनिल गवस (नाट्यकर्मी लेखक-दिग्दर्शक समीक्षक),श्री.अंबर हडप (हिंदी आणि मराठी मालिका आणि चित्रपट लेखक), श्री.प्रसाद दाणी(मराठी अभिनेते), श्री.मंगेश अपराज उपस्थित होते.

अनिल गवस यांनी  नवोदिताना मार्गदर्शन करताना सांगितले की, रंगमंचावर येऊन उभ राहून दोन शब्द बोलण हा आत्मविश्वास जो पुढे जीवनभर पुरतो, यासाठी ही जी रंगभूमी आहे ही रंगभूमी खूप महत्वाची आहे. त्यामुळे आपला हा रंगमंच सतत व्यक्तिमत्व विकास घडवत असतो त्यामुळे सर्वांनी शिक्षण घेणे हे खूप गरजेचे आहे असे ते म्हणाले.

अंबर हडप हे बोलले नाटक म्हणजेच जीवन आहे. कारण नाटकामध्ये जशी तालिम होते, रंगीत तालीम होते त्यानंतर प्रयोग होतो परंतु त्यानंतर सुद्धा आपल्याला तालिम करायला हवी असेते , म्हणूनच जीवनामधे तालिम करत राहा

यावेळी श्री.सिद्धार्थ साळवी (लेखक-दिग्दर्शक) , श्री.जितेंद्र तुपे (गायक), श्री.राहुल गंद्रे (ध्वनी संयोजक), श्री.निशांत ओहळ (संगीतकार) नवनाथ दळवी (अक्षर गणेश चित्रकार),श्री.नरेंद्र गायकवाड (पीआरपी ,महाराष्ट्र प्रदेश सचिव), श्री.गणेश पाटील(पखवाज वादक), श्री.भास्कर वाकडीकर(अभिनेता ऑर्केस्ट्रा आर्टिस्ट),श्री.धीरज शिंदे (अभिनेता निर्माता) ,श्री.कपिल आडोळे(छायाचित्रकार) यांनी या कार्यक्रमाला भेट दिली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.