करंजाडे ग्रामपंचायत सरपंच रामेश्वर आंग्रे यांना “आदर्श सरपंच” पुरस्कार
सिटी बेल • पनवेल •
आपला सरपंच आपला गौरव ग्रामपंचायतीच्या विकासात नवराष्ट्रची साथ या कार्यक्रमातंर्गत सरपंच सम्राट पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन अलिबाग येथील पीएनपी सहकारी सांस्कृतिक कला विकास मंडळ येथे नुकताच पार पडला.
यावेळी पनवेल तालुक्यातील करंजाडे ग्रामपंचायतीचे सरपंच रामेश्वर आंग्रे यांना विधान परिषदेचे आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते दैनिक नवराष्ट्र सरपंच सम्राट पुरस्कार 2022 अंतर्गत आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पनवेल तालुक्यातील करंजाडे ग्रामपंचायतीचे सरपंच रामेश्वर आंग्रे यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यतांतून विविध योजनांच्या सहाह्याने सर्वसामान्य जनतेच्या विविध विकास कामे केली आहेत. त्याचबरोबर आंग्रे यांनी गावामध्ये विकासकामे करण्यावर भर दिलेला आहे. त्याचबरोबर कोरोनाचा कालखंडामध्ये जनजागृती, लसीकरण मोहीम विशेष मोहीम राबवून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली त्याच पद्धतीने आडसरह स्मशानभूमीसाठी जिल्हा व शासन स्तरावर पाठपुरावा सुरु आहे.
यावेळी सरपंच रामेश्वर आंग्रे यांनी बोलताना सांगितले कि, गावामध्ये विकासात्मक कामे करण्यासाठी गावातील सर्व नागरिकांचे मोलाचे मार्गदर्शन वेळोवेळी सूचना मिळाल्या त्यामुळेच इथपर्यंत पोहोचलो आहे. विविध योजनांची माहिती नागरीकांपर्यंत पोहचवून अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला.
गावातील प्रत्येक नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी तत्पर असल्याचे तसेच सुद्धा आदर्श गाव होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी विधान परिषदेचे आमदार अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.








Be First to Comment